नागपूर : काँग्रेस पक्षाने लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता हिमाचल राज्याच्या शिमला लोकसभा मतदार संघातील अर्की विधानसभा मतदार संघाच्या निरीक्षकपदी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदेश सिंगलकर यांची नियुक्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी तेलंगणा राज्याच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी “वॉररूम”चे सहप्रभारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच तेलंगणामध्ये चार महिने काम केले. पक्षाने त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून हिमाचल प्रदेशातील शिमला या अतिशय महत्वाच्या मतदार संघाची जबाबदारी त्यांचेवर सोपविली आहे.

हेही वाचा…नागपुरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय.. महावितरणने हे काम हाती घेतले..

राज्याच्या राजकारणात संदेश सिंगलकर यांचे उच्चशिक्षित, अतिशय शिस्तप्रिय, अभ्यासू, कट्टर गांधीवादी, निष्ठावान राजकारणी म्हणून ओळख आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी, घराणेशाही नसलेले व भारतीय वायू सेनेतून स्वेच्छा निवृत्ती घेऊन काँग्रेस पक्षात अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी निष्ठेने कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. २० वर्षापूर्वी सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश करून नागपूर शहर काँग्रेसचे प्रवक्ता, सचिव, महासचिव अशी वाटचाल करत सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सचिव पदावर कार्यरत आहेत.

हेही वाचा…नागपुरातील महामेट्रोचा “सेव्हन वंडर्स” प्रकल्प वादात…… लाखो रुपये खर्चून उभारलेले “वंडर्स” तोडण्याचा खर्च…..

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, मोहन जोशी यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. भारत जोडो यात्रेत महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तत्पूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकीत, तेलंगना, गोवा, देगल्लूर, बिलोली तसेच लोकसभा निवडणुकीत मुंबई, नागपूर, पुणे येथे निरीक्षक पदी कार्य केलेले आहे.

हेही वाचा…संघाकडून प्रशिक्षण वर्गात बदल…..आता तृतीय संघ शिक्षा वर्ग नव्हे तर…….

दरम्यान, त्यांचे वडील गांधी विचारांचे होते आणि विनोबांच्या भूदान चळवळीत त्यांनी जमीन दान दिली होती. संदेश सिंगलकर यांनी वायुदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विदर्भ आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्याकरिता अनेक आंदोलने केली. संपूर्ण विदर्भाचा दौरा केला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विदर्भ आंदोलनातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन विदर्भाचा मुद्दा कसा रेटून धरायचा याबाबत मांडणी केली. एवढेच नव्हे तर स्वतंत्र विदर्भाची चळवळ विदर्भात सर्वदूर पोहचवण्याकरिता ‘विदर्भ मिरर’ हे साप्ताहिक सुरू केले.ते वेगळ्या विदर्भाचे समर्थक आहेत. या आंदोलनात लढाईला राजकीय मार्गातूनच दिशा मिळू शकते हे ठाम मत झाल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करून निवडणूक राजकारणापासून तूर्तास दूर राहिले. त्यांची कार्यपद्धती, बोलण्याची शैली पाहून नागपूर शहर काँग्रेसच्या प्रवक्तेपदी सिंगलकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर माध्यमांमध्ये पक्षाची भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे नागपूर जिल्ह्याच्या सरचिटणीस पदावर बढती मिळाली. त्याचकाळात महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे सदस्य झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress appoints sandesh singalkar as inspector for arki vidhan sabha constituency in shimla lok sabha seat rbt 74 psg
Show comments