धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला. नाना पटोले शनिवारी नागपुरात बोलत होते.

“बहुजन आघाडीसह सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात चर्चा करत आहेत. हितेंद्र ठाकूर यांनी काल आम्हाला आणि आज भाजपाला पाठिंबा दिला. पण, आमचे नेते त्यांच्याशी चर्चा करून वेळेच्या आत त्याचे मतपरिवर्तन करतील,” असे नाना पटोले म्हणाले.

Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
mp krupal tumane latest marathi news, mp krupal tumane cm eknath shinde latest marathi news
मुख्यमंत्र्यांसमोर रामटेकवरून भाजपविरोधी खदखद
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी उदयपूर चिंतन शिबिराबाबतही भाष्य केले आहे. “राज्यात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर असलेल्या ५१ जणांनी राजीनामा दिला. पण, आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या काळात नवीन अध्यक्ष नेमायचा का की निवडणुकीपर्यंत यांना कायम ठेवावे, याबाबत पक्षश्रेष्ठीनशी चर्चा करणार आहे,” असे नाना पटोले म्हणाले. तर गांधी परिवाराला हात लावला, तर देशभरात जेलभरो करु. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल, असेही पटोले म्हणाले.

कराड विनाअधिकाराचे मंत्री!

रेल्वे आणि कोळशाचे भाडे महाराष्ट्र सरकारकडे शिल्लक आहे असे भागवत कराड म्हणाले. परंतु,  भागवत कराड यांना काय अधिकार आहे माहीत नाही. ज्यांना मंत्रीमंडळात अधिकार नाही, त्यांना आकडेवारी कशी मिळते, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.