नागपूर : कारमध्ये बसलेल्या प्रेयसीची ओळख पटू नये म्हणून कुख्यात गुंडाने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला कारच्या बोनटवरून फरफटत नेले, अशी धक्कादायक माहिती तपासात निष्पन्न झाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाश उत्तम चव्हाण (२७) आणि पल्लवी दिलीप देशमुख (२३) अशी आरोपींची नावे असून आकाशला पोलिसांनी अटक केली. गेल्या नऊ वर्षांपासून आकाश व पल्लवीचे प्रेमसंबंध आहेत. रविवारी आकाश हा पल्लवीला भेटायला आला. तिला एमएच- ३१-डीव्ही-३२२२ या क्रमांकाच्या कारमध्ये बसवून फिरायला घेऊन गेला. सक्करदरा चौकात वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल अमोल भोजराज चिदमवार (३९), रा. रामकृष्णनगर दिघोरी व महिला पोलीस शारदा यांच्यासह कारला काळी फिल्म असणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध सक्करदरा चौकात कारवाई करीत होते. अमोल यांना आकाशच्या कारला काळी फिल्म लावली असल्याचे दिसले. त्यांनी आकाश याला कार थांबवण्याचा इशारा केला. कार थांबवल्यास  पल्लवीची ओळख पटेल, या भीतीने आकाश याने कारचा वेग वाढवला व अमोल यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अमोल यांनी प्रसंगावधान राखत बोनेटवर उडी घेत कारला घट्ट पकडून ठेवले. आकाश याने सुमारे ५०० फुटापर्यंत आकाश यांना बोनेटवरून फरफटत नेले. आयुर्वेदिक कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर कार थांबवली. अमोल खाली उतरले. परिसरातील नागरिकांनी आकाश याला कारमधून बाहेर काढून चांगलाच चोप दिला. माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी आकाश याची नागरिकाच्या तावडीतून सुटका केली. आकाश व पल्लवीला पोलीस ठाण्यात  आणले. शासकीय कामात अडथळा निर्माण करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news love couple crime car traffic police akp
First published on: 01-12-2020 at 02:03 IST