प्रक्रिया पारदर्शकच – वडेट्टीवार यांचा दावा

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्य़ातील दारूबंदी उठवल्यानंतर विक्रे त्यांचे परवाने नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून  सर्व जुन्या परवानाधारकांना यात प्राधान्य दिले जात आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता बाळगण्यात येत असल्याने नवीन परवान्यासाठी इच्छुक असणारे व राजकीय विरोधक विनाकारण यावर तत्थहीन आरोप करून चिखलफेक करीत आहेत, असा दावा चंद्रपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकसत्ताशी बोलताना केला.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील दारूबंदी मागे घेतल्यानंतर मद्य परवान्यांच्या नूतनीकरणाबाबत होणारे आरोप पालकमंत्री वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले. नवीन परवाने द्यायचे नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्याच बरोबर जेवढे जुने परवानाधारक आहेत. त्यांनाच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परवाने नूतनीकरण्याची प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली आहे. मात्र यामुळे नव्याने परवाने मागणारे नाराज झाले व ते जाणीवपूर्वक आरोप करीत सुटले आहेत. यात कु ठलेही तत्थ नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

दारूविक्रीसाठी सर्वप्रथम उत्पादन शुल्क खात्याचा परवाना लागतो, त्यानंतर संबंधित विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते, या प्रक्रियेला उशीर लागत असतो,  दुसरीकडे जिल्ह्य़ात दारूबंदी घोषित झाल्यावर अनेक विक्रे त्यांनी त्यांचा व्यवसाय इतर जिल्ह्य़ात स्थानांतरित के ले. बंदी उठल्याने आता त्यांना पुन्हा जिल्ह्य़ात  व्यवसाय सुरू करायचा आहे. यासाठी निर्धारित प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

जिल्ह्य़ातील सद्यस्थिती

जिल्ह्य़ात एकूण ३१४ परवानेधारक बार अँड रेस्टारन्ट आहेत. त्यापैकी २५२ सुरू झाले आहेत. वॉईनशॉप एकूण २४ आहेत. त्यापैकी १९ व्यवसायिक इतर जिल्ह्य़ात स्थानांतरित झाले आहेत, तर चार सुरू झाले आहेत. देशी दारूचे १०८ परवाने आहेत. त्यापैकी ८० दुकान सुरू झाले आहेत. बियर शॉप एकूण ५० परवाने आहेत. सध्या ३४ सुरू झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील देशी दारू, बार अँड रेस्टारन्ट, वाईनशॉप, क्लब, बियर शॉपींच्या एकू ण संख्येपैकी आतापर्यंत २० ते ३० टक्के विक्रे त्यांनी व्यवसाय सुरू केलेला नाही. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. काहींनी दुकानाची जागा विकली. कुणाची शाळेजवळ, मंदिराजवळ दुकाने आहेत, तर काहींचे कौटुंबिक कलह व काही नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत.