वर्धा: जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे पितळ डेंग्यूच्या साथीत उघडे पडले आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डांत डेंग्यू व कावीळचे वीस-वीस रुग्ण आढळत आहे. मात्र त्यासाठी रुग्णालयात पुरेशी व्यवस्था नसल्याने रुग्ण बेजार तर त्यांचे आप्त हवालदिल झाल्याची स्थिती आहे. त्यात ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची दैनंदिन भर पडत आहे. पर्याय नसल्याने मग एकाच बेडवर दोन रुग्णांना ठेवण्याची आपत्ती आहे.

गरजू रुग्णांना वेळेवर सावंगी नाही तर सेवाग्राम येथील रुग्णालयात रेफर केल्या जात असल्याची स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अतूल वांदिले यांनी निदर्शनास आणली. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर यांना भेटून अवगत केले. परिस्थिती चिघळू नये म्हणून बंद असलेली उपकरणे दुरुस्त करावी, योग्य उपचाराच्या सुविधा द्याव्यात, वेळेवर अन्यत्र रेफर करू नये, अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

Waiting for Upazila Hospital of Uran possibility of funds getting stuck in code of conduct of elections
उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, निवडणुकीच्या आचारसंहितेत निधी अडकण्याची शक्यता
Pune, Sassoon, politics,
पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल
Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
govandi shatabdi hospital marathi news
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल

हेही वाचा – नागपूर ‘एम्स’मध्ये ‘स्पाइनल कॉर्ड इंज्युरी टेलि’ पुनर्वसन केंद्र

हेही वाचा – नागपुरात ‘डेंग्यू’च्या प्रकोपातही महापालिका, मेडिकल, मेयोत समन्वय नाही; चाचणीसाठी टोलवाटोलवी

डेंग्यूने दोघांचा बळी गेला असूनही लोकप्रतिनिधी, आमदार, शासन निद्रावस्थेत असल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा वंदिले यांनी दिला आहे. चारशे बेडचा दर्जा मिळाल्याचा दावा करीत थाटात उद्घाटन केले. पण शंभर बेड तरी मोजून दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले आहे.