नागपूर : ‘डेंग्यू’च्या प्रकोपात किट्स अभावी नागपूर महापालिकेतील डेंग्यू चाचण्या ठप्प आहेत. महापालिकेने मेडिकल-मेयोत विचारणा केल्यावर त्यांना किट्सचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. तर मेडिकलकडून महापालिकेने विचारणाच केली नसल्याचा दावा होत आहे. यामुळे त्यांच्यात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.

नागपुरात डेंग्यूसदृश्य आजाराचा प्रकोप आहे. डेंग्यूग्रस्तांची संख्या सोमवारी रात्रीपर्यंत ४०४ रुग्णांवर पोहोचली. रुग्ण वाढल्यावरही दुसरीकडे महापालिकेच्या प्रयोगशाळेत डेंग्यू चाचणी किट्स संपल्याने या चाचण्या बंद आहेत. महापालिकेकडून मेडिकल-मेयोतील प्रयोगशाळेशी संपर्क साधल्यावर तेथेही किट्सचा तुटवडा पुढे आला. त्यामुळे त्यांनीही तूर्तास तेथे नमुने तपासणी शक्य नसल्याचे सांगितले.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

हेही वाचा – VIDEO : अखंड भारत कधीपर्यंत होईल? मोहन भागवतांनी मांडलं मत; म्हणाले…

महापालिकेला विचारणा केल्यावर मेडिकलकडून त्यांनी एनआयव्हीकडे डेंग्यू तपासणी किट्सची मागणी केल्याचे कळवले गेले. तर मेयोमध्ये सध्या केवळ २ किट्स शिल्लक असून त्यांनीही इतर संस्थेला किट्स मागितल्याचे पुढे आले. या विषयावर मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार म्हणाले की, अद्याप महापालिकेकडून मला किट्स वा डेंग्यूचे नमुने तपासण्याबाबत विचारणा झाली नाही. मेडिकलमध्ये आवश्यक संख्येने किट्स उपलब्ध आहेत. महापालिकेच्या विषयावर मी भाष्य करणार नसल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे! डॉ. मोहन भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकल- मेयोतील प्रयोगशाळेशी संपर्क साधला. त्यावर तेथे किट्सचा तुटवडा असल्याचे पुढे आल्याने तूर्तास तेथे आमचे नमुने तपासण्यास अडचणी आहेत. परंतु, आम्हाला लवकरच किट्स मिळणार असल्याने येथेच चाचणीला गती दिली जाईल. – डॉ. नरेंद्र बहिरवार, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नागपूर महापालिका.