अमरावती : राज्‍यात कुपोषणाला आळा घालण्‍यासाठी, तसेच बालमृत्‍यू, मातामृत्‍यूंचे प्रमाण कमी व्‍हावे, या उद्देशाने स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या ‘टास्‍क फोर्स’च्‍या अध्‍यक्षपदी माजी आरोग्‍यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्‍यांच्‍या नियुक्‍तीची घोषणा केली असून या ‘टास्क फोर्स’मध्ये महिला बाल विकास, आरोग्य, आदिवासी, कृषी, अन्न व नागरी पुरवठा विभागांचे अप्पर सचिव, सचिव, प्रधान सचिव, आयुक्‍त यांचा समावेश आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्‍या राज्याच्या कुपोषण निर्मुलनातील उल्लेखनीय योगदान लक्षात घेऊन त्यांची राज्याच्या कुपोषण निर्मुलन टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्‍यात आले आहे.

Amit Shah Slams Uddhav Thackeray
अमित शाह यांचा हल्लाबोल, “नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या भीतीने…”
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
central government, appoints manoj panda
वित्त आयोगाच्या सदस्यपदी अर्थतज्ज्ञ मनोज पांडा, डॉ. निरंजन राजाध्यक्ष यांच्या जागी निवड

हेही वाचा – नागपूर : पत्नीच्या प्रियकराची पतीने केली धुलाई

भाजपा-शिवसेना युती सरकारच्‍या काळात डॉ. दीपक सावंत हे आरोग्‍यमंत्री होते, पण विधान परिषद सदस्‍यत्‍वाची मुदत संपूनही पुन्‍हा संधी न देण्‍यात आल्‍याने त्‍यांनी राजीनामा दिला होता. गेल्‍या मार्चमध्‍ये डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेच्‍या शिंदे गटात प्रवेश केला होता. लगेच त्‍यांना महत्त्वाची जबाबदारी सोपविण्‍यात आली आहे.