‘डॉ.पंदेकृवि’ नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करणार ; राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली उद्या ३६ वा दीक्षांत सोहळा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे.

‘डॉ.पंदेकृवि’ नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करणार ; राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली उद्या ३६ वा दीक्षांत सोहळा

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलैला सकाळी ११ वाजता होणाऱ्या ३६ व्या दीक्षांत समारंभात नितीन गडकरींना पदवी प्रदान करण्यात येईल. या समारंभात ३६४६ स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

दीक्षांत समारंभात माजी कुलगुरू पद्मश्री डॉ. एम. एल. मदान यांची विशेष उपस्थिती राहील. या दीक्षांत समारंभात ३२३४ पदवीधर, ३८१ पदव्युत्तर व आचार्य ३१ असे एकूण ३६४६ स्नातकांना पदवी प्रदान केली जाणार आहे. या समारंभात एकूण २५६ प्रत्यक्ष, तर ३३९० विद्यार्थी अप्रत्यक्षरित्या पदवी स्वीकारतील. कार्यक्रमात ८२ पारितोषिक व पदके प्रदान करण्यात येईल. एम.एससी उद्यानविद्यामध्ये सर्वाधिक चार पदके शुभांगी प्रमोद देवकर या विद्यार्थिनींने मिळवले. बी.एससी. कृषीमध्ये दुर्गेश कैलास नरवाडे याने सहा पदके पटकावले. बी.टेकमध्ये अश्विनी वासुदेव हुशे हिने सात पदके प्राप्त केली आहेत, अशी माहिती डॉ. विलास भाले यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dr pandekrivi to honor nitin gadkari with doctor of science title amy

Next Story
“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ
फोटो गॅलरी