नागपूर : केंद्र सरकारच्या सूचनेवरून राज्याच्या परिवहन खात्याकडून एकीकडे सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबत अभ्यास सुरू असतानाच राज्यात आठ मोबाईल चेक पाॅईंट सुरू करण्यात आले. महसूल वाढवण्यासाठी परिवहन खात्याने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

राज्यातील नवीन मोबाईल चेक पाॅईंटमध्ये पेठ, मरवडे, वरूड, मुक्ताईनगर, सावनेर, उमरगा, हाडाखेड, मंद्रुपचा समावेश आहे. राज्यात प्रवेश करणारी व बाहेर जाणारी व्यावसायिक वाहने सीमा तपासणी नाक्यावरील तपासणी टाळण्याच्या हेतूने नाक्याला वळसा घालून जातात. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो. रस्ता सुरक्षाही धोक्यात येते. त्यामुळे मोबाईल चेक पाॅईंट कार्यान्वित केल्याचा परिवहन खात्याचा दावा आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Shikhar Bank Malpractice Case There has been no irregularity in the working of the bank
शिखर बँक गैरव्यवहारप्रकरण : बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Left to right) Vijay Dev, Anurag Agarwal and Vikram Dev Dutt. (Express Archives)
चंदीगडच्या IAS अधिकाऱ्यांनी पॅरीसमध्ये केली जिवाची मुंबई, ऑडिट रिपोर्टमध्ये ठपका

हेही वाचा – नागपूर : ३४ बालके गर्भातच दगावली! १८ नवजातांचा महिनाभरात मृत्यू

दरम्यान, शासनाने यापूर्वीच केंद्र शासनाच्या निर्देशावरून राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करायचे झाल्यास नियमानुसार काय प्रक्रिया अवलंबवावी लागेल याबद्दल अभ्यास सुरू केला आहे. परंतु, याबाबतचा निर्णय होण्यापूर्वीच मोबाईल चेक पाॅईंटच्या नावावर आठ तपासणी नाक्यांची भर पडल्याने या क्षेत्रातील जाणकारांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘बीओटीसाठी’ २००९ ला करार

परिवहन विभागाच्या २२ सीमा तपासणी नाक्यांचे बांधा, वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वावर आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मे. महाराष्ट्र बाॅर्डर चेक पाॅईंट नेटवर्क लि. यांच्याशी सवलत करार ३० मार्च २००९ रोजी करण्यात आला आहे.

हेही वाचा – नागपूर : मेडिकलमध्ये अमृत महोत्सवादरम्यान मुलींची ‘रॅगिंग’ ! आरोग्य विद्यापीठाकडे तक्रार

“राज्यातील सीमा तपासणी नाके बंद करण्याबाबत अभ्यासगट आणि नवीन मोबाईल चेक पाॅईंट सुरू करणे हे दोन वेगवेगळे विषय आहेत. चेक पाॅईंटबाबतचा विषय आमचा नसून या विषयावर संबंधित अधिकाऱ्याशी बोलणे योग्य राहील.” – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई.