नागपूर: विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाकडे गेलेल्या विधानसभा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी मंत्री नवाब मलिक पोहचले. या प्रसंगी त्यांनी महत्वाचे भाष्यही केले.
महाविकास आघाडी सरकार काळात नवाब मलिक राज्याचे अल्पसंख्याक मंत्री होते. त्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली़ होती. न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने ते साध्य बाहेर आहेत. दरम्यान सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी फूट पडली आहे. त्यानंतर दोन्ही गटाकडून नवाब मलिक हे आमच्या गटात असल्याचा दावा केला जातो. परंतु नवाब मलिक यांनी अद्याप ते कोणत्या गटाकडून आहे, हे स्पष्ट केले नाही.
हेही वाचा… वाहतूक नियम मोडले म्हणून चलान; पण साडेचार कोटींचा दंड वसूल कसा करणार…
दरम्यान अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले. हे कार्यालय सध्या अजित पवार गटाकडे आहे. येथे त्यांनी मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. कोणत्या गटात नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे ते कोणत्या गटात आहे. हे अद्याप स्पष्ट नाही.