नागपूर : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा स्वत: गावकऱ्यानी महेंद्रीच्या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सात गावांनी ठराव घेतला आहे. एवढेच नाही तर त्यासाठी कृ ती समितीही स्थापन के ली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या १७व्या बैठकीत गावकऱ्याच्या मागणीची दखल घेण्यात आली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनखात्याला दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य वन्यजीव मंडळाच्या १५व्या बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी महेंद्रीला अभयारण्याचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर केला. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनखात्याच्या अधिकाऱ्याना दिले होते. मात्र, प्रादेशिक विभागाने नकारात्मक आणि वन्यजीव विभागाने सकारात्मक असे परस्परविरोधी प्रस्ताव सादर करुन मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्ना के ला. परिणामी, १६व्या बैठकीत महेंद्रीला अभयारण्याचा दर्जा देण्याऐवजी संवर्धन राखीवचा दर्जा देण्यात आला.

फे ब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच गावकऱ्यानी अभयारण्यासाठी तीव्र आंदोलन सुरू के ले आहे. या क्षेत्रात सात गावे असून या सातही गावांनी अभयारण्याच्या बाजूने ठराव घेतला आहे. त्यासाठी कृ ती समिती स्थापन के ली आहे.

विशेष म्हणजे, महेंद्री आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील मध्यप्रदेशातील पेडोली या गावाने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. जंगलाला अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा दिल्यास जंगलावरील आपला हक्क संपतो, अशी गावकऱ्याची धारणा असल्याने गावकऱ्याचा त्याला विरोध असतो. पूनर्वसनासाठी सहजासहजी गावकरी तयार होत नाहीत. मात्र, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा गावकरी महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात यावा म्हणून अडून बसले आहेत. राज्य वन्यजीव मंडळाच्या १७व्या बैठकीत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीच्या एजंड्यावर हा विषय नसतानादेखील स्वत:हून  एक महिन्यात याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनखात्याच्या अधिकाऱ्याना दिले.

त्यामुळे १५व्या बैठकीत राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदेशाला हुलकावणी देत त्यांची दिशाभूल करणारे अधिकारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या आदेशाचे तरी पालन करणार का, याकडे वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

वाघ, बिबट्यासह तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास

सुमारे ६७ चौरस किलोमीटरचे हे क्षेत्र असून येथे वाघ, बिबट, अस्वल, लांडगा आणि तृणभक्षी प्राण्यांचा अधिवास आहे. सुमारे २१२ प्रजातींचे पक्षी, ६० प्रकारची फु लपाखरे आणि १२५पेक्षा अधिक कोळ्यांच्या प्रजाती या जंगलात आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी वाघांच्या प्रजननाच्या नोंदी आहेत. वाघाच्या प्रजननासाठी हे सुरक्षित क्षेत्र असून मेळघाट-पेंच-सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा महत्त्वाचा व्याघ्रसंचार मार्ग आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Give sanctuary status to mahendra forest akp
First published on: 23-10-2021 at 23:30 IST