scorecardresearch

गोंडवाना विद्यापठाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने की बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने; कुलगुरू जाहीर करणार अंतिम निर्णय

गोंडवाना विद्यापीठाच्या आज सोमवारी झालेल्या विद्या परिषदेच्या ऑनलाईन बेठकीत परीक्षा प्रचलित पद्धतीने घ्यायची की बहुपर्यायी पद्धतीने घ्यायची याबाबत चर्चा करण्यात आली.

आज तातडीने घेतलेल्या विद्या परिषदेच्या ऑनलाईन बैठकीत चर्चा; १ जून पासून परीक्षा, विद्यार्थि गोंधळात

रवींद्र जुनारकर
गोंडवाना विद्यापीठाच्या आज सोमवारी झालेल्या विद्या परिषदेच्या ऑनलाईन बेठकीत परीक्षा प्रचलित पद्धतीने घ्यायची की बहुपर्यायी पद्धतीने घ्यायची याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान बहुपर्याय की प्रचलित याबाबतचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्यावर सोपविण्यात आले आहे. हा निर्णय कुलगुरू उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. विद्यार्थि संघटनांचा दबाव तथा नागपूर आणि इतर विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याने गोंडवाना विद्यपीठाच्या परीक्षाही तशाच होतील अशी चर्चा आहे.
गोंडवाना विद्यापीठाचे पहिले बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. २२ एप्रिल रोजी विद्यापीठाने तसे पत्रही काढले होते. मात्र सहा दिवसात हा निर्णय फिरवीत 28 एप्रिल रोजी प्रचलित पद्धतीने ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. पेपरच्या कालावधी ३.४५ तास असा ठेवण्यात आला होता. १ जून पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. तसे वेळापत्रक पण विद्यापीठाने जाहीर केले आहे. दरम्यानच्या काळात नागपूर विद्यापठांतर्गत परीक्षा विषयाला घेऊन विद्यार्थि संघटनांची आंदोलने झाली. त्याचा परिणाम दोन दिवसापूर्वी नागपूर विद्यापीठाने बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला जळगाव विद्यापीठ पण त्याच पद्धतीने परीक्षा घेत आहे. त्याचा परिणाम गोंडवाना विद्यापीठात विविध विद्यार्थि संघटनांनी आंदोलन केले. बहुपर्यायी परीक्षा घ्या अशी मागणी केली. गोंडवाना विद्यापीठवर दबाव वाढला. परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायची हे ठरविण्यासाठी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची आज ऑनलाईन सभा झाली. त्यात बहुपर्यायी की प्रचलित पद्धत यावर चर्चा झाली. शेवटी परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कुलगुरू डॉ. बोकारे यांच्याकडे सोपविण्यात आले. उद्या मंगळवारी ते यासंदर्भात निर्णय घेतील अशी माहिती कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. उद्या उच्च शिक्षा मंत्री उदय सामंत नागपुरात आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू व अधिकारी यांच्यासोबत त्यांची बेथक होणार आहे. त्यानंतरच परीक्षेचा निर्णय होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान 1 जून ला अवघ्या सात दिवसांचा अवधी आहे. त्यात पुन्हा विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत बदल केला तर विद्याथ्र्यांचा चांगलाच गोंधळ उडणार आहे. त्यामुळे कुलगुरू कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gondwana vidyapatha examinations prevailing method multiple choice question method announce final vidya parishad exams students confused amy