नागपूर : कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांमधील सुप्त कला-गुणांना वाव दिल्यामुळे कैद्यांकडून दैनंदिन वापरापासून ते शोभिवंत वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जात जाते. कैदी निर्मित वस्तूंना आता कारागृहातून विक्री करण्यासह ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे कारागृहातील उत्पादनांना देशभरातून मागणी वाढणार आहे.

अनेक कैद्यांच्या हातून कळत-नकळत गुन्हा घडल्यामुळे ते कारागृहात शिक्षा भोगत असतात. त्यापैकी काही कैद्यांच्या हातात सुप्त कला-गुण असतात. त्या कैद्यांच्या कलेला वाव देत कारागृह प्रशासन कारागृहात वस्तू निर्मिती करण्यात येते. त्यात शेतीपासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश असतो.

हेही वाचा – ‘फॅन्सी’ नंबरची ‘क्रेझ’! चंद्रपूरकरांनी आवडीच्या नंबरसाठी मोजले तब्बल ४२ लाख ८५ हजार

राज्यातील कारागृहात पैठणी साडी, लाकडी वस्तू, नऊवार साडी, चपला, टॉवेल, दरी, गणेश मूर्ती, विविध प्रकारची सागवानी लाकडी टेबल, खुर्च्या, कपाट, बेंच, शर्ट, रुमाल, बेडशीट, लेदर बॅग, सँडल, लाकडी शोपीस, पर्यावरणपूरक पिशव्या, जॅकेट, कुर्ता, चामडी कमरपट्टा, आणि बेकरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात. त्या वस्तू कारागृहात दिवाळीला १० दिवसांसाठी प्रशासनासाठी विक्रीसाठी प्रदर्शनी भरवतात. मात्र, हवा तसा प्रतिसाद कारागृहातील वस्तूंना मिळत नाही. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत नवा उपक्रम राबवला जाणार आहे.

महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांनी बनवलेली विविध उत्पादने ऑनलाईन पोर्टलवर किंवा ॲप्सद्वारे (फ्लिफकार्ट, ॲमेझॉन, मार्ट) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कारागृह प्रशासनाने ऑनलाईन विक्रीसाठी तयारी केली असून त्याचे दरपत्रकही तयार करण्यात आले आहे. लाकडी उत्पादनापासून ते कापडी पिशव्यापर्यंतच्या अशा ४०० हून अधिक वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे. कारागृह प्रशासन आणि ऑनलाईन कंपन्यांशी चर्चा सुरू असून येत्या काही दिवसांतच कारागृहातील वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

हेही वाचा – नागपूर : प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीला गर्भपातासाठी झाडपाला दिला, त्यामुळे तिची..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कैद्यांमुळे कारागृहाला आर्थिक बळ

कारागृहातील उद्योगांतर्गत सुतारकाम, शिवणकाम, पैठणी आणि नऊवार साडी काम, लोहारकाम, यंत्रमाग, हातमाग, बेकरी, चर्मकला, धोबीकाम, कागद कारखाना, रंगकाम, रसायन उद्योग, मोटार सर्व्हिसिंग, मूर्ती काम इत्यादी उद्योग चालवले जातात. गतवर्षी कारागृहातील कारखाना उद्योगाचे ११ कोटी आणि शेतीचे २.४० कोटी रुपयांचे उत्पादन झाले आहे. कारागृहातील वस्तूंची ‘ऑनलाईन’ विक्री सुरू झाल्यास कारागृह विभागाला आर्थिक बळ मिळणार आहे.

कारागृहात कैद्यांनी निर्मिती केलेल्या वस्तूंची ‘ऑनलाईन’ विक्री करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल. कारागृहातील वस्तू देशभर पोहोचण्यासाठी कारागृह प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे, असे राज्य कारागृह विभाग, अपर पोलीस महासंचालक, अमिताभ गुप्ता म्हणाले.