लोकसत्ता टीम

नागपूर: मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्यात नुकतीच बैठक होऊन त्यात खाजगी वाहनांच्या टोल मुक्ती बाबत विस्तृत चर्चा झाली व काही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण राज्याच्या सर्वांगीण विकासात सर्वात मोठा वाटा असलेल्या व राज्यातील खेड्या पाड्यातील गरीब प्रवासी जनतेचे एकमेव साधन असलेल्या एसटीकडून होत असलेल्या गैरवाजवी टोल वसुली बाबतीत साधी चर्चाही झाली नाही. हे दुर्दैवी असून सरकारला गरिबांच्या एसटीचा विसर पडला आहे का ?असा सवाल महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला आहे.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

एसटीच्या साधारण साडे चौदा ते साडे चौदा हजार गाड्या प्रत्यक्ष रस्त्यावर धावत असून त्यातून दररोज ५२ लाख प्रवासी व दररोज साधारण ६० ते ७० हजार फेऱ्या होत आहेत. रस्तावर प्रत्यक्ष धावणाऱ्या प्रत्येक गाडी मागे एसटीला टोल भरावा लागत असून त्या मुळे एसटी महामंडळाला दरवर्षी सरासरी १६२ ते १६७ कोटी रुपये इतका टोल भरावा लागत आहे.

आणखी वाचा-सासऱ्याच्या घरावर सूनेने लावले अश्लील फोटो

विविध कारणांमुळे महामंडळाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटीचा संचित तोटा ९००० कोटी रुपयांच्या घरात असून पुरवठादारांची आजही ८५० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. अशातच ज्येष्ठ नागरिक महिलांना शासनाने दिलेल्या प्रवासातील सवलतीमुळे व कर्मचाऱ्यांच्या व व्यवस्थापनाच्या अथक प्रयत्नांमुळे महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचले आहे. आता मासिक तोटा कमी झाला असून मासिक तूट फक्त २४ कोटी रुपये इतकी खाली आली आहे. एसटीला टोल मधून मुक्ती दिल्यास नफ्याच्या एकदम जवळ पोहचू शकते. त्यामुळे साहजिकच राज्यातील गरीब प्रवासी जनतेला अजून चांगल्या सवलती देता येतील व दिलासा मिळू शकेल. या शिवाय महामंडळा समोरील आर्थिक अडचणी सुद्धा दूर होऊ शकतील. त्यामुळे पुढील बैठकीत सरकारने एसटी बसला लागणाऱ्या टोल वसुली बाबतीत सुद्धा फेर विचार करून टोल मधून एसटीला पूर्णतः मुक्ती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.