देशातील सवरेत्कृ ष्ट दहा राष्ट्रीय उद्यान, पाच तटीय व समुद्री उद्यान आणि पाच प्राणिसंग्रहालयाची यादी आता प्रत्येक वर्षी जाहीर करून त्यांना पुरस्कृ त करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. सोमवारी देशातील १४६ राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्यांचा व्यवस्थापन प्रभावशीलता मूल्यांकन अहवाल त्यांनी जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील या संपूर्ण राष्ट्रीय उद्यान व  वन्यजीव अभयारण्याचा सरासरी गुणांक ६२.०१ टक्के आहे. यात हिमाचल प्रदेशातील तीर्थन वन्यजीव अभयारण्य व ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यानाचा गुणांक सर्वाधिक ८४.१७ टक्के तर उत्तर प्रदेशातील कासव वन्यजीव अभयारण्याचा गुणांक सर्वात कमी म्हणजे २६.६६ टक्के आहे. ११ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य (अतिशय उत्कृष्ट ), ४६ राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्य (उत्कृष्ट ), ५६ राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य (साधारण) आणि सहा राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्य (वाईट) या श्रेणीत आहेत. या मूल्यांकनाकरिता १६ स्वतंत्र तज्ज्ञ समिती गठित करण्यात आल्या होत्या. क्षेत्रीय भेट, राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापक आणि मुख्य वन्यजीव रक्षकांशी संवाद आणि अभ्यासातून हे मूल्यांकन करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकु टा वन्यजीव अभयारण्य, कर्नाटकातील नुगू वन्यजीव अभयारण्य आणि पश्चिम बंगालमधील सजनाखली वन्यजीव अभयारण्याचे मूल्यांकन मात्र समितीला करण्यात आले नाही. त्रिकुटा अभयारण्य हे काही कारणास्तव अजूनही वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले नाही. नुगू अभयारण्य हे बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाचा तर सजनाखली हा सुंदरबन व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. त्यामुळे त्याचे मूल्यांकन करण्यात आले नाही, असे कारण मूल्यांकन अहवालात देण्यात आले आहे. हे तीन वगळता देशातील इतर सर्व राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्याचे मूल्यांकनाचे चक्र  पूर्ण झाले आहे. अनेक प्रकारच्या अडचणी असूनही भारतातील संरक्षित क्षेत्राचे व्यवस्थापन संवर्धनाची लक्ष्य पूर्ण करण्यात प्रभावी ठरले आहे. भारत जैवविविधता संपन्न देश बनला असून वाघांच्या जागतिक संख्येच्या तुलनेत ७० टक्के वाघ भारतात, सिंहाच्या जागतिक संख्येच्या तुलनेत ७० टक्के भारतात आणि बिबटय़ांच्या जागतिक संख्येच्या तुलनेत ६० टक्के बिबट भारतात आहेत. यावरून संरक्षित क्षेत्राचे परिस्थितीकी तंत्र उत्कृष्ट असल्याचे सिद्ध होते, असे जावडेकर म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor the best national parks and zoos in the country abn
First published on: 16-01-2021 at 00:22 IST