बुलढाणा : चुरशीच्या वातावरणात आज, शनिवारी पार पडलेल्या संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विक्रमी मतदान झाले. १८ संचालक पदासाठी ९७.४१ टक्के मतदानाची नोंद झाली असून हे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सहकार व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजता धीम्यागतीने मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १२ नंतर मात्र मतदानाने गती घेतली. यानंतर अंतिम टप्प्यात झालेले विक्रमी मतदान अखेरपर्यंत कायम राहिले.

हेही वाचा : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी नागपूर-पुणे विशेष गाडी

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Nashik, Teams inspection, auction,
नाशिक : खासगी जागेवर कृषिमाल लिलावामुळे तपासणीसाठी पथके नियुक्त
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

सहकारी संस्था मतदारसंघात ३३८ पैकी ३३५ (९९.११टक्के), ग्रामपंचायत मतदारसंघात ४७३ पैकी ४५३(९५.७७), व्यापारी मतदारसंघात २१० पैकी २०७ म्हणजेच ९८.५७ टक्के मतदानाची नोंद झाली. सहकारी संस्था पातुरडा केंद्रावर १०० टक्के मतदान झाले. यातुलनेत हमाल मापारी मतदारसंघात ९६.९४ टक्के मतदान झाले. एकूण १११९ पैकी १०९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून याची टक्केवारी ९७.४१ इतकी आहे. हे वाढीव मतदान आघाडी की महायुतीच्या पथ्यावर पडणार, याचा निर्णय मतमोजणीअंतीच होणार आहे.