हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाला सात महिने पूर्ण होत आले आहेत. या संघर्षात गाझा पट्टीचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी इस्रायली सैन्याने रफाहमध्ये हल्ले सुरू केले आहेत. इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझाच्या महत्त्वाच्या रफाह सीमा क्रॉसिंगचे नियंत्रण ताब्यात घेतले. हा इजिप्त आणि दक्षिण गाझाला जोडणारा एकमेव मार्ग होता.

रफाहमध्ये हल्ले सुरू झाल्यानंतर हमासने माघार घेण्याचा निर्णय घेतला. पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासने युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेसाठी शस्त्रसंधी प्रस्तावाला मान्यता दिली आणि आपल्या तीन टप्प्यांतील अटी पुढे ठेवल्या. मात्र, इस्रायलने या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला. आमच्या महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होत नसल्याचे सांगत इस्रायलने हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या तपशिलांच्या आधारे युद्धविरामासाठी हमासने तीन टप्प्यांत कळविलेल्या अटी खालीलप्रमाणे :

narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न

हेही वाचा : Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?

पहिला टप्पा

-४२ दिवसांचा युद्धविराम. यादरम्यान हमास ३३ इस्रायली ओलिसांना जिवंत किंवा मृत मुक्त करील. त्या बदल्यात इस्रायल मुक्त केलेल्या प्रत्येक इस्रायली ओलिसाच्या जागी ३० मुले आणि महिलांची सुटका करील. हमासने अटकेच्या सुरुवातीच्या तारखेनुसार प्रदान केलेल्या यादीच्या आधारावर ही सुटका केली जाईल.

रफाहमध्ये हल्ले सुरू झाल्यानंतर हमासने माघार घेण्याचा निर्णय घेतला. (छायाचित्र-रॉयटर्स)

-युद्धविरामाच्या पहिल्या दिवसापासून मानवतावादी मदत, मदत सामग्री व‌ इंधनासाठी पुरेशा प्रमाणात प्रवेश करण्यास इस्रायलने परवानगी द्यावी. दररोज ५० इंधन ट्रक्ससह एकूण ६०० ट्रकच्या प्रवेशांना परवानगी दिली जाईल; ज्यापैकी ३०० ट्रक उत्तर गाझासाठी असतील.

-कराराच्या तिसऱ्या दिवशी हमास तीन इस्रायली ओलिसांची सुटका करील आणि नंतर दर सात दिवसांनी आणखी तीन ओलिसांची सुटका करेल. शक्य असल्यास महिलांना प्राधान्य दिले जाईल.

-सहाव्या आठवड्यात हमास उरलेल्या सर्व नागरी ओलिसांची सुटका करील. इस्रायली तुरुंगात असणार्‍या पॅलेस्टिनी कैद्यांची योग्य संख्या इस्रायल सांगेल.

-त्यानंतर इस्रायल गाझामधून काही प्रमाणात सैन्य मागे घेईल आणि पॅलेस्टिनींना दक्षिणेकडून उत्तर गाझापर्यंत ये-जा करण्याची परवानगी देईल.

इस्रायली सैन्याने मंगळवारी गाझाच्या महत्त्वाच्या रफाह सीमा क्रॉसिंगचे नियंत्रण ताब्यात घेतले. (छायाचित्र-रॉयटर्स)

-गाझा पट्टीवरील लष्करी उड्डाणे दररोज १० तास थांबतील आणि ओलीस व कैद्यांची सुटका करण्याच्या दिवशी १२ तासांसाठी थांबतील.

-पहिल्या पॅलेस्टिनी कैद्यांना सोडल्यानंतर तिसऱ्या दिवशी इस्रायली सैन्य उत्तर गाझामधील अल-रशीद रस्त्यावरून पूर्णपणे माघार घेईल आणि स्वत:ची सर्व लष्करी ठिकाणे नष्ट करील.

-पहिल्या टप्प्याच्या २२ व्या दिवशी इस्रायली सैन्य गाझा पट्टीच्या मध्यभागी असलेल्या सलाह अल-दिन रस्त्याच्या पूर्वेकडील इस्रायली सीमेवरून माघार घेईल.

दुसरा टप्पा

-गाझामध्ये शाश्वत शांतता पुनर्संचयित करण्यासाठी करारासह आणखी ४२ दिवस दिले जातील.

-गाझामधून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार

-इस्रायलने पॅलेस्टिनींना तुरुंगातून सोडविल्यानंतर त्या बदल्यात हमास इस्रायली सैनिकांची सुटका करील.

इस्रायल सैन्य मागे घेण्यास वारंवार नकार देत आला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

तिसरा टप्पा

-मृतदेहांची देवाणघेवाण पूर्ण केली जाईल.

-गाझा पट्टीवरील नाकेबंदी संपेल.

-गाझाकडून पुनर्बांधणीसाठी तीन ते पाच वर्षांच्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाईल. त्यामध्ये घरे, नागरी सुविधा व पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी केली जाईल. इजिप्त, कतार आणि यूएन यांसह अनेक देश आणि संस्थांच्या देखरेखीखाली नुकसानीमुळे प्रभावित झालेल्या सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल.

हेही वाचा : मुंबईपेक्षाही लहान असलेली ‘गाझा’पट्टी गेल्या १०० वर्षांत युद्धभूमी कशी ठरली?

हमासने या अटी पुढे ठेवताच इस्रायलने पुन्हा रफाहमध्ये हल्ले सुरू केले. याच्या एका दिवस पूर्वीच इस्रायलने रफाहयधील नागरिकांना हा परिसर खाली करण्याची सूचना दिली होती. हमासने ठेवलेल्या या अटींमध्ये सैन्य मागे घेण्याच्या अटीचाही समावेश आहे. त्यासाठी इस्रायलने वारंवार नकार दिला आहे.