बुलढाणा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आज रविवारी संतनगरी शेगावात येणार आहे. अयोध्या मंदिर राष्ट्रार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ते विविध तिर्थक्षेत्रांना भेटी देत आहे. दरम्यान सरसंघचालकाना ‘झेड प्लस’दर्जाची सुरक्षा असल्याने शेगाव व अन्यत्र ठिकाणी तसेच वाशीमात दर्जाच तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार डॉ. भागवत आज १९ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजता संतनगरी शेगावात दाखल होतील. गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ते काही ‘निवडक भेटी ‘ घेणार आहे. यानंतर संध्याकाळी उशिरा ते वाशिम कडे रवाना होणार आहेत. आज वाशिम येथे त्यांचा मुक्काम असून उद्या सोमवारी ते श्री.क्षेत्र माहूरगडला रेणुका मातेच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
bjp leader ganesh naik campaign for his son sanjeev naik
गणेश नाईकांची पुत्र संजीव नाईकांसाठी मिरा-भाईंदर मध्ये मोर्चे बांधणी, जुन्या समर्थकांना सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

हेही वाचा : उपराजधानीतील ‘लॉजिस्टिक हब’वर लक्ष केंद्रीत करणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

पार्श्वभूमी अन कडक व बंदोबस्त

अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रार्पण सोहळा जानेवारी महिन्यात आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक देशभरातील तीर्थक्षेत्र , देवस्थानांच्या प्रवास करीत आहेत. या प्रवास योजनेअंतर्गत त्यांचा आज शेगाव प्रवास असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांच्यासाठी शेगाव व अन्यत्र कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरीक्षक, १० सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, १४२ पोलीस कर्मचारी, १० महिला पोलिस यासाठी तैनात आहेत.