नागपूर : अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यामुळे वारंवार मारहाण करणाऱ्या सख्ख्या भावाच्या त्रासाला कंटाळलेल्या बहिणीने प्रियकराला सुपारी दिली आणि भावाचा खून करण्याची योजना आखली. प्रियकराने मित्राच्या मदतीने प्रेयसीच्या भावाचा खून करून खिंडसी तलावात मृतदेह फेकला. हे हत्याकांड ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले. रजत कैलास उघडे (३०, रा. आशीर्वाद नगर, कोतवाली) असे मृताचे, तर आभा उघडे (२८), प्रियकर अतुल भमोडे आणि पप्पू शामलाल बुरडे (२८, कळमना) अशी आरोपींची नावे आहेत.

रजतला दारूचे व्यसन होते. तो आई व घटस्फोटीत बहीण आभा उघडे यांना नेहमी मारहाण करीत होता. त्यामुळे आभा त्याच्या त्रासाला कंटाळली. आभाचे लग्न झाले होते. मात्र, काही दिवसांतच ती पतीला सोडून माहेरी आली होती. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला. नंतर ती अतुलच्या प्रेमात पडली. दारूडा भाऊ नेहमी घराबाहेर राहत होता. दरम्यान, अतुल आभाला भेटायला घरी येत होता. आभाच्या आईला मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत माहिती होती. त्यामुळे ती त्यांना विरोध करीत नव्हती. एक दिवस आभाला भेटायला अतुल घरी आला होता. दरम्यान, तिचा भाऊ रजतही घरी आला. त्यावेळी घरात हे दोघेही आढळले. त्याने अतुलला मारहाण केली. तो पळून गेल्यानंतर बहीण आभालाही जबर मारहाण केली. त्यानंतर तो वारंवार बहीण आणि आईला मारहाण करीत होता. त्याच्या वागण्याला दोघीही कंटाळल्या होत्या.

गावात राहावे कोण्या बळे?
गावात राहावे कोण्या बळे?
Sensex Ends Week on Positive Note, Sensex Rises 75 Points, sensex rises, Sensex Rises Buying in Oil and Banking Stocks, stock maret, share market, share market news,
खरेदी बळावल्याने पाच सत्रातील घसरणीला लगाम, ‘सेन्सेक्स’ पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
Jabalpur double murder
प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे १५ वर्षीय मुलीने वडील आणि लहान भावाची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे…
theft, girl, Andheri, fake,
चोरी दडवण्यासाठी कल्याणमध्ये अंधेरीतील तरुणीने रचला ॲसिड फेकल्याचा बनाव
Hindu marriage- legal rights
विवाह अवैध ठरला तर पोटगीसारखे कायदेशीर हक्क गमवावे लागणार का?
Stock market, share market, Stock market boom or recession, bullish market, bearish market, lok sabha election impact on stock market, stocks, nifty finance article,
शेअर बाजारात तेजी येणार की मंदी? निकालानंतर बाजारावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे?
vaibhav anil kale death former army officer col vaibhav anil kale killed in gaza
अक्षम्य संकेतभंगाचे बळी
Benefits Of Adding Jaswandi Petals In Tea Can gudhal Phool Help Reduce Blood Sugar
चहात ‘या’ फुलाच्या पाकळ्या घातल्याने डायबिटीस कमी करण्याचा मार्ग होईल सोपा? तज्ज्ञांनी सांगितलं किती हवं प्रमाण?

हेही वाचा >>>शहरी मतदार घरी, कार्यकर्ते नाराज, परिणामी मतटक्क्य़ात घसरण

भावाला संपवून टाक

१६ एप्रिलला दुपारी रजत दारू पिऊन घरी आला. त्याने आभाशी वाद घातला. त्यानंतर तो झोपला. आभाने प्रियकराला फोन केला आणि भावाला संपवून टाक, असे सांगितले. अतुलने मित्र पप्पू बुरडे याला बोलावून घेतले. सायंकाळी झोपेतून उठलेल्या रजतला पप्पूने दारू पिण्यासाठी नेले. त्याला दारू पाजली. तेथून पप्पू आणि अतुलने रजतला खिंडशीत नेले. तेथे त्याचा गळा आवळून खून केला आणि तलावात फेकून दिले. यानंतर आभाकडून पैसे घेऊन दोघेही पार्टी करण्यास गेले.

टॅटूवरून लागला छडा

रजतचा मृतदेह खिडशी तलावात आढळला. त्याच्या हातावर टॅटू होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांच्या पथकाने शोधमोहीम राबवली. रजतची ओळख पटली. चौकशीदरम्यान बहीण आभावर संशय बळावला. तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला असता अतुलचे नाव समोर आले. दोघांचे छायाचित्र आणि प्रेमसंबंध समोर आले. अतुलला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली.