नागपूर: उपराजधानीत भ्रमनध्वनीचे व्यसन ही एक गंभीर समस्या होत चालली आहे. शहरातील विविध मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण शंभर रुग्णांपैकी सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन असल्याचे निरीक्षण मानसोपचार सोसायटी नागपूरने नोंदवले आहे.

नागपुरातील मेडिकल रुग्णालयातील मानसोपचार विभागात रोज सुमारे १२० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यापैकी ६ टक्के रुग्ण रात्री झोप येत नसल्याची तक्रार घेऊन येतात. या रुग्णांची खोलवर विचारना केल्यास त्यांना भ्रमनध्वणीवर रात्री उशिरापर्यंत समाजमाध्यम, रिल्स बघणे, वेब सिरीज बघणे, गेम खेळण्याचे व्यसन असल्याचे पुढे येते, अशी माहिती मंगळवारी मेडिकलच्या मानसोपचार विभागात झालेल्या पत्रपरिषदेत मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेचे नवनीयुक्त अध्यक्ष डॉ. मनिष ठाकरे यांनी दिली.

Pune, Sassoon, politics,
पुणे : ससूनमध्ये राजकारण जोमात, रुग्णसेवा कोमात! उपचार अन् औषधाविना रुग्णांचे हाल
private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…

हेही वाचा – वर्धा : डॉक्टरची पदवी देतो म्हणून टाकला फास, केले साडेतेरा लाख रुपये लंपास…

भ्रमनध्वणीच्या व्यसनामुळे या व्यक्तीच्या स्वभावात बदल, चिडचिडपणा, झोप न येणे, नैराश्यासह इतरही काही बदल जाणवतात. या व्यक्तीच्या एकाग्रतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या व्यक्तीवर उपचार करताना त्याचे व्यसन कमी करण्यासाठी त्याचा भ्रमनध्वणीचा वापर हळू- हळू कमी करावा लागतो. त्यासाठी प्रसंगी मनावर ताबा मिळवण्यासाठी काही मानसिक आजारांचे सौम्य औषधांचाही वापर करावा लागत असल्याचेही डॉ. मनिष ठाकरे यांनी सांगितले.

लहान मुलांपासून तरुण मुलांचे प्रमाण जास्त

सध्या सततच्या मद्यपानाला व्यसनची व्याख्या लागू पडत असली तरी भ्रमनध्वणीचे व्यनस शास्त्रीय दृष्ट्या मान्य केले जात नाही. त्यातच बरेच पालक मुलगा अभ्यासाला बसल्यावर दहा ते पंधरा मिनटांहून जास्त एकाग्रतेने अभ्यास करत नसल्याचीही तक्रार घेऊन येतात. तर भ्रमनध्वणी बघताना मात्र तो २ ते ३ तास सतत त्यातच बघत असतो. भ्रमनध्वनीवर सतत स्क्रिन बदलत असल्याने तेथे एकाग्रतेशी संबंध नसतो. परंतु पालकांनी मुलांच्या भ्रमनध्वनी वा इतर कोणतेही टीव्ही वा स्क्रिन बघण्यावर बंधन घालण्याची गरज आहे. जेणेकरून या गंभीर व्यसनापासून मुलांना वाचवणे शक्य होईल, असे सोसायटीचे नवनीयुक्त डॉ. सुधीर महाजन म्हणाले.

हेही वाचा – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात, “२०२४ तर जिंकूच! पुढील लक्ष्य २५ वर्षांच्या विजयाचे…”

मुलांच्या आवडी डिजिटल नकोच

हल्ली मुलांच्या बहुतांश आवडी भ्रमनध्वनी वा टीव्हीवर काही बघणे असल्याचे चित्र दिसते. परंतु पालकांनी या आवडी बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यातूनच मुलांना भ्रमनध्वनीच्या व्यसनापासून वाचवणे शक्य आहे, असे डॉ. अभिजित बनसोड म्हणाले. दरम्यान कौटुंबिक दुराव्यामुळे सध्याच्या लहान कुटुंब पद्धतीनेही नैराश्य वाढून तरुणांमध्ये आत्महत्यासारखे प्रकार वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानसोपचार सोसायटीचा पदग्रहन रविवारी

मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेच्या (२०२४-२५) अध्यक्षपदी डॉ. मनिष ठाकरे तर सचिवपदी डॉ. सुधीर महाजन यांची निवड झाली आहे. नवीन चमूमध्ये विविध पदांची जबाबदारी डॉ. प्रिती भुते, डॉ. आशिष कुथे, डॉ. निखिल पांडे, डॉ. अभिषेक मामर्डे, डॉ. श्रेयश मागिया, डॉ. मोसम फिरके, डॉ. रवी ढवळे, डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. प्रांजली वाघमारे, डॉ. मोनिषा दास, डॉ. कुमार कांबळे, डॉ. श्रीलक्ष्मी व्ही. हे सांभाळतील. या शाखेचा पदग्रहन समारंभ १० मार्चला (रविवारी) नागपुरातील हाॅटेल तुली इम्पीरियलमध्ये होईल.