नागपूर : अवकाळी पावसामुळे उन्हाळा जाणवत नसला तरी धरणातील जलस्तर मात्र खालवत चालला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात मोठ्या धरणातील पाणी साठा ४ टक्क्याने तर मध्यम प्रकल्पातील साठा ५ टक्क्याने कमी झाला आहे. नागपूर विभागात एकूण १६ मोठे प्रकल्प आहे. मागच्या वर्षी म्हणजे १९ मे २०२३ ला या प्रकल्पांमध्ये ४३.७९ टक्के पाणी होते. यंदा १९ जूनला ३९ टक्के म्हणजे चार टक्के खाली आला आहे. विभागात ४२ मध्यम प्रकल्प आहेत.त्यात मागच्या वर्षी मे महिन्यात ४४.७७ टक्के पाणी होते. यंदा १९ मेला ३९.४३ टक्के म्हणजे पाच टक्के कमी झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणात मागच्या वर्षी ५९ टक्के पाणी होते यंदा ५०.३८ टक्के आहे. हीच स्थिती वडगाव धरणाची आहे. तेथे मागील वर्षी याच काळात ३८ टक्के पाणी होते यंदा ते ३४ टक्के आहे. नांद धरणात यंदा ७.७७ टक्के पाणी आहे, मागच्या वर्षी याच काळात या धरणात १९ टक्के पाणी होते.
जलसंकटाची चाहूल; मोठ्या, मध्यम धरणात पाच टक्के जलस्तर खालावला
अवकाळी पावसामुळे उन्हाळा जाणवत नसला तरी धरणातील जलस्तर मात्र खालवत चालला आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-05-2024 at 11:59 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
TOPICSउन्हाळाSummerधरणDamनागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur NewsपाणीWaterमराठी बातम्याMarathi News
+ 2 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur water in large dams declined by 4 percent and in medium dams by 5 percent cwb 76 css