नागपूर: जेव्हा आपण दृढनिश्‍चय करतो व यश मिळविण्यासाठी दिवसरात्र एकत्र करून प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेतो तेव्हा यश आपलेच असते. याचे मूर्तीमंत उदाहरण आहे ते आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचे. ते आज लाखो तरुणांचे आदर्श आहेत.

रमेश घोलप यांना लहानपणीच पोलिओ झाला. त्यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. दोन वेळेच्या जेवणाचीही सोय न्हवती, पोटासाठी त्यांची आई रस्त्यावर फिरून बांगड्या विकत असे. रमेश यांच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते. त्यांच्या कुटुंबात चार सदस्य. वडिलांना दारूचे प्रचंड व्यसन असल्याने संपूर्ण परिवार रस्त्यावर आला होता. दारूचे व्यसन इतके वाढले की, त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले. यामुळे कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी आईसोबत रमेश हेदेखील बांगड्या विकण्यासाठी फिरू लागले. मात्र, आपल्या मुलाने खूप शिकावे ही आईची इच्छा होती.

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
india s gold demand rises 8 percent in jan march despite increase in prices
चढ्या दरानंतरही देशात सोन्याच्या मागणीत वाढ; तिमाहीत आठ टक्क्यांनी वाढून १३६.६ टनांवर
Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
narendra modi
बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!

हेही वाचा – नागपूर – मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसमधून मुलगी पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव…

गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी रमेश आपल्या काकांच्या गावी गेले. सन २००५ मध्ये रमेश जेव्हा बारावीत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काकांच्या गावापासून स्वत:च्या घरी जाण्यासाठी बसचे भाडे केवळ सात रुपये होते. मात्र, रमेश विकलांग असल्याने त्यांना केवळ दोन रुपये भाडे लागत होते. परंतु दुर्दैव इतके की, त्यांच्याकडे दोन रुपयेदेखील नव्हते. तेव्हा शेजार्‍यांच्या मदतीने रमेश वडिलांच्या अंत्यविधीला कसेबसे घरी पोहोचले. वडिलांचे छत्र डोक्यावरून हरपल्यानंतरही त्यांनी १२ वीत ८८ टक्के मिळवले. घरची जबाबदारी असल्याने डीएड करून गावातल्या एका शाळेत ते शिक्षक म्हणून रुजूदेखील झाले. याचवेळी त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली. आपला मुलगा खूप शिकला, शिक्षक झाला याचे कौतुक आईला होते. मात्र, रमेश यांचे लक्ष्य काही तरी वेगळेच होते.

रमेश यांनी सहा महिन्यांकरीता नोकरी सोडून यूपीएससीची तयारी केली. २०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाची जिद्द पाहून आईने गावातून काही पैसे उसनवारीने घेतले. त्यानंतर रमेश पुणे येथे जावून यूपीएससीची तयारी करू लागले. यावेळी रमेश यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते मोठे अधिकारी होत नाही तोपर्यंत गावकर्‍यांना आपले तोंडही दाखविणार नाही.

हेही वाचा – बुलढाणा : मध्यरात्रीच्या अंधारात डिझेलचा काळा बाजार!

प्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक परिश्रमाच्या जोरावर काय करू शकतो, याची प्रचिती २०१२ मध्ये आली. रमेश हे यूपीएससीच्या परीक्षेत २८७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कोणत्याही प्रकारच्या शिकवणीला न जाता महागडी पुस्तके न खरेदी करता गरीब व निरक्षर आई-वडिलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला. त्यांची पहिली नियुक्ती कुंती (झारखंड) येथे झाली. तेथे एक प्रमाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. आयएएस रमेश घोलप सध्या झारखंडमध्ये जिल्हाधिकारी आहेत.