राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात विदर्भ आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत. या सरकारने महाराष्ट्राला केवळ सुडाचं राजकारण दिलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा – बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेचा नितीन देशमुखांनी घेतला समाचार; मतीमंद प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख म्हणाले…

uddhav thackeray eknath shinde devendra fadnavis
“फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
supriya sule water shortage in maharashtra
“ट्रिपल इंजिनचे खोके सरकार असंवेदनशील, त्यांना…”; राज्यातील पाणी टंचाईवरून सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका!
What Ram Satpute Said?
“सुशीलकुमार शिंदेंनी मुख्यमंत्री असताना १२ अतिरेक्यांना वाचवलं”, राम सातपुतेंचा गंभीर आरोप

काय म्हणाले जयंत पाटील?

आमची वज्रमूठ ही विदर्भातल्या शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ राज्य सरकारला विचारते आहे, तुम्ही गेल्या वर्षभरात नेमके काय दिवे लावले. खरं तर शिंदे-फडणवीस सरकारने वर्षभरात विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाठी कोणताही महत्त्वाचे निर्णय घेतले नाहीत. या सरकारने महाराष्ट्राला केवळ सुडाचं राजकारण दिलं, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा – VIDEO : “१५ दिवस थांबा राज्याच्या राजकारणात दोन मोठे बॉम्बस्फोट होतील”, प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा!

विरोधात बोलणाऱ्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचं काम सुरू”

आज जे लोक भाजपा विरोधात बोलतात त्यांच्या विरोधात सुडाचं राजकारण केलं जात आहे. अशा लोकांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. जे लोक विरोधात बोलतात, त्यांच्या विरोधात तपासयंत्रणांचा ससेमिरा लावला जातो, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “अजित पवारांची अमित शाहांबरोबर…”, संजय शिरसाटांचा मोठा दावा; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…

अर्थसंकल्पाला दिलेल्या स्थगितीवरून शिंदे सरकारवर टीका

दरम्यान, शिंदे सरकारने सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींना दिलेल्या स्थगितीवरून त्यांनी टीकास्र सोडलं. शिंदे सरकारने सत्ते आल्याआल्या अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील विविद तरतुदींना स्थगिती दिली. अजित पवार यांनी एक समतोल अर्थसंकल्प मांडला होता. पण त्यांनी कामांना स्थगिती देण्यांचं पाप या सरकारने केलं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.