भंडारा : ‘माझ्यासोबत बोलत का नाही?’ म्हणत माजी सरपंचाने हल्ला करून विवाहित महिलेला गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील मच्छेरा येथे घडली. याप्रकरणी आरोपी योगेश रामचंद्र कोकुडे (४७) याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक! आमदार निवासात साफसफाई करताना आढळल्या दारूच्या बाटल्या..

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Case against five persons in case of death of worker due to crane hook falling on head
पुणे : डोक्यात क्रेनचा हुक पडून कामगाराच्या मृत्यूप्रकरणी पाचजणांविरुद्ध गुन्हा
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक

हेही वाचा >>> सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, तर मग आधी ‘हे’ वाचाच…

 योगेश कोकुडे हा मच्छेरा गावचा माजी सरपंच आहे. तो गावातीलच ४५ वर्षीय महिलेच्या संपर्कात होता. दरम्यान, महिलेने योगेशसोबत बोलणे बंद केले. यामुळे संतापलेल्या योगेशने सदर महिलेला माझ्यासोबत बोलत का नाही, असे विचारले. मात्र, महिलेने कारण सांगण्यास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी रात्री २ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिहोरा पोलिसांनी योगेशला अटक केली आहे.