बल्लारपूर येथील महाराणा प्रताप वॉर्डात वाजपेयी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणीला येणाऱ्या नवव्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी शिक्षक संजय प्रभुदयाल वाजपेयी (४५) याला बल्लारपूर पोलिसांनी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत अटक केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
आरोपी वाजपेयी हा भाजप बल्लारपूर शहर सचिव पदावर कार्यरत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी शिकवणीत धडक देत शिक्षकाला चांगलेच बदडले. दरम्यान, वाजपेयी सचिवपदावर कार्यरत नाही, तो भाजपचा पदाधिकारीही नाही, असा दावा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला आहे.