scorecardresearch

MLC Election Result : मोठी बातमी, नागपुरात भाजपाला धक्का; मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

MLC election update maharashtra 2023 सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार नागोराव गाणार यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली होती.

Adbale of Mavia won by seven thousand votes
मविआचे अडबाले सात हजार मतांनी विजयी

नागपूर : Maharashtra mlc election result 2023 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजनीला आज सकाळी ८ वाजता नागपूर शहरातील अजनी रेल्वेचे समुदाय भवन येथे सुरुवात झाली. सुरूवातीलाच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार याचा पराभव केला.

हेही वाचा >>> MLC Election Result Today 2023 : अमरावती पदवीधर मतदार संघात मतमोजणी सुरू, निकालाची उत्‍कंठा

पहिल्या फेरीच्या मतमोजणीत अडबाले यांना १४०७१ तर गाणार यांना ६३०९ मते मिळाली. एकूण ७ हजाराहून अधिक मतांनी अडबाले आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली भाजपाने गाणार यांची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, फडणवीस, गडकरी यांनी त्यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. दरम्यान, पहिल्या फेरीत अडबाले यांनी निर्णायक आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 16:17 IST