नागपूर: Maharashtra mlc election result 2023 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता अजनीच्या समुदाय भवन येथे सुरुवात झाली. २१ टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यांना  ८१४२ मतं  भाजप समर्थित विद्यमान आमदार नागो गाणार यांना १४१६ मतं मिळाली आहेत. अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान या निवडणुकीत ८६ टक्के मतदान झाले. ३४३६० मतदारांनी मतदान केले. त्यापैकी२८ हजार मतांची मोजणी पूर्ण झाली भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur division teachers constituency election the primary results is in favor of maviya dag 87 ysh
First published on: 02-02-2023 at 15:05 IST