scorecardresearch

जी-२० साठी नागपूरचे सौंदर्यीकरण, रस्ते दुभाजकावरील झाडांची चोरी कॅमेरात कैद

नागपूरमध्ये २० मार्चपासून दोन दिवस जी-२० परिषद होत असून त्यासाठी शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे

nagpur g20
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर: नागपूरमध्ये २० मार्चपासून दोन दिवस जी-२० परिषद होत असून त्यासाठी शहराचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. परिषदेचे स्थळ असलेल्या वर्धा मार्गाचा कायापालट करण्यात आला आहे. रस्ते दुभाजकावर सुंदर झाडे लावण्यात आली आहे. चोरट्यांची नजर त्यावर पडली आणि त्यांनी रात्री काही झाडे पळवली. पण चोरटे मोबाईल कॅमेरात कैद झाले आणि त्यांचे बिंग फुटले.

छत्रपती चौकाजवळ हा प्रकार घडला. दोन तरूणांनीरात्रीच्या वेळी दुभाजकावरील झाडे कारमध्ये टाकत पळ काढला. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

viral video

आणखी वाचा- अकोला: गुंठेवारी नियमानुकूल करण्यात कागदपत्रांच्या अडचणी; घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ

नागपूर महापालिकेने शहराच्या विविध भागात लावलेली झाडे नागपूरकरांचे लक्ष वेधून घेणारी आहे. प्रथम दर्शनी कोणालाही ती आपल्या घरी असावी, असे वाटते. महापालिकेने ती कुठून खरेदी केली याचीही चर्चा आहे. रस्ते दुभाजकावर ती लावल्याने व त्याला संरक्षित कठडे किंवा कुंपण नसल्याने ती पळवणे सहज शक्य आहे. महापालिकेने लावलेली मेनहोल्सवरील लोखंडी झाकणे पळवण्याचे प्रकार नियमित घडतात. पण झाडे पळवण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे. त्यामुळे याची शहरात सध्या जोरात चर्चा आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:59 IST