नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार असो यांच्याशी थेट भिडण्यास मागे पुढे पाहत नाही, अशी त्यांची ओळख झाली आहे. पटोले म्हणतात, की आमची लढाई कोण्याएका अडाणी सोबत नव्हे तर मोदानी सोबत आहे. संपूर्ण देशाची संपत्ती एका व्यक्तीला लुट देण्याचे धोरण केंद्रातील सरकारचे आहे. त्याविरोधात आम्हाला बोलण्याचा अधिकारी आहे, असे पत्रकार परिषदेत ठणकावून सांगताना महाराष्ट्रात आधी ईडी सरकार होते आता ‘ईडा’ सरकार असल्याचे म्हटले आहे. नंतर त्याचा खुलासा करताना ते म्हणाले, ‘ई’ म्हणजे एकनाथ शिंदे, ‘डी’ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि ‘ए’ म्हणजे अजीत पवार होय. या तिघांचे सरकार म्हणजे “ईडा” सरकार, असेही ते म्हणाले.