पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील घोटपाडी येथील पोलीस पाटील पिडो पुंगाटी याची गोळ्या घालून हत्या केली. शुक्रवारी पहाटे १५ ते २० नक्षलवादी घोटपाडी गावात आले. पिडो पुंगाटी याचे घर गाठून त्याला झोपेतून उठवून चौकात आणले. तेथे त्याला मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शुक्रवारी दुपारी उशिरा या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. नक्षलवाद्यांच्या या हत्यासत्रामुळे आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण आहे.