नागपूर: पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त १२ जानेवारीला नेत्र तपासणी शिबीर झाले. यावेळी कार्यालयात आलेल्या वाहन चालकांसह इतरांची  नेत्र तपासणी केली गेली. त्यापैकी तब्बल १५.३८ टक्के नागरिकांमध्ये दृष्टिदोष आढळून आला.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या विनंतीवरून गुरूवारी रिलायन्स विजन एक्सप्रेस येथील नेत्ररोग तज्ज्ञांची चमू पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आली. येथे जड वाहनांच्या फिटनेससाठी आलेल्या ट्रक ड्रायव्हर, विविध वाहनांची चाचणी देण्यासाठी आलेले वाहन चालकांसह वाहनांशी संबंधीत कामाला आलेल्या एकूण १५६ जणांची नेत्र तपासणी केली गेली. त्यापैकी २४ जणांना चष्मा लागल्याची कल्पनाही नव्हती.

Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई

रिलायन्स विजन एक्सप्रेस आयकडून तपासणीसाठी डॉ. दर्शन नागलकर, डॉ. अंकुर गौतम उपस्थित होते. तर शिबीराच्या यशस्वीतेसाठी आरटीओतील नरेंद्र कठाणे, विरसेन ढवळे, निनाद सुर्वे यांनी प्रयत्न केले. यावेळी उपस्थितांना रस्त्यावर वाहन चालवितांना घ्यावयाची खबरदारी, वाहतुकीचे नियम व संयम याचीही माहिती दिली गेली.