बुलढाणा : India Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Updates बुलढाणा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी( दि २६) मतदानास  संथगतीने प्रारंभ झाला. आज सकाळी ७ ते ९ दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात जेमतेम ६.६१ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण सहापैकी चिखली   विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९.७० तर जळगाव जामोद  मतदारसंघात सर्वात कमी३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

एकूण १७ लाख ८२हजार ७०० मतदारांसाठी १९६२ मतदान केंद्र आहेत. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. निवडणूक विभागाने  दिलेल्या माहितीनुसार दोन तासाच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची  टक्केवारी ६.६१ इतकी आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत १, १९ ००० जणांनी मतदान केले.

Akola Lok Sabha Constituency, Lok Sabha Election 2024 Voting Updates in Marathiprakash ambedkar, anup dhotre, dr abhay patil, voted, 7 percent in first two hours, marathi news, polling in akola, voting in akola,
Akola Lok Sabha Election 2024 : अकोल्यात पहिल्या दोन तासात ७.१७ टक्के मतदान; उमेदवार प्रकाश आंबेडकर, अनुप धोत्रे, डॉ. अभय पाटील यांनी बजावला हक्क
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
prashant kishor on bjp in loksabha election 2024
Video: २०२४च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित; म्हणाले, “यावेळी पहिल्यांदाच…”
election second phase news
“थोडं गरम व्हायला लागलं की राहुल गांधी…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला

हेही वाचा >>> यवतमाळ-वाशिममध्ये सकाळी नऊपर्यंत केवळ ७.२३ मतदान, समर्थकांमध्ये धाकधूक

विधानसभा निहाय मतदान पुढीलप्रमाणे आहे.बुलढाणा ४.४२टक्के, चिखली ९.७० मेहकर ९.०७,सिंदखेडराजा ७.४०,खामगाव ५.७९ जळगाव जामोद ३.१९ टक्के. दरम्यान, आज लग्नतिथी(लग्न मुहूर्त)आहे. मात्र सोनाळा  (ता. संग्रामपूर) येथील नवरदेवाने या धामधुमीत पाहिले मतदान केले. यानंतर तो लग्न मंडपात पोहोचला.