scorecardresearch

Premium

पाच लाखांची नुकसान भरपाई द्या, नागपूरच्या पूरग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

२३ सप्टेंबरला नागपूरमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आणि लाखोंच्या वस्तू खराब झाल्या. यामुळे शासनातर्फे दिली जाणारी दहा हजार रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे.

compensation of five lakhs Nagpur flood victims demand from Chief Minister
येत्या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा मानस देखील पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे. (फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता टीम

नागपूर : २३ सप्टेंबरला नागपूरमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले आणि लाखोंच्या वस्तू खराब झाल्या. यामुळे शासनातर्फे दिली जाणारी दहा हजार रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. पुरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदनपत्र नागपूरमधील पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. येत्या काळात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचा मानस देखील पूरग्रस्तांनी व्यक्त केला आहे.

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
Student organizations protest against Governor Arif Mohammad Khan in Kerala
केरळच्या राज्यपालांचे रस्त्यावरच दोन तास ठाण; ‘एसएफआय’च्या निदर्शनांनंतर केंद्राकडून झेड सुरक्षा
foundations destroyed in Titwala
टिटवाळ्यात ९० जोते भुईसपाट, बेकायदा चाळी उभारणीसाठी जोत्यांची उभारणी
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?

आणखी वाचा-चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नागरिकांनी उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची समिती स्थापित करून पूर का आला याबाबत न्यायिक चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. अंबाझरी तलावाच्या दुरवस्थेबाबत शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अंबाझरी तलावाचा ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ ( संरक्षणात्मक अंकेक्षण) करण्यात यावा, नाग नदीच्या प्रवाहासाठी उपाययोजना राबविण्यात यावी, महामेट्रोद्वारा अनधिकृतपणे तयार करण्यात आलेल्या एक्वा पार्कला तोडण्यात यावे तसेच विवेकानंद स्मारकाची जागा बदलण्यात यावी, अशी मागणी निवेदनपत्रात करण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने पुढील कारवाई करिता निवेदनपत्र आपदा निवारण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pay compensation of five lakhs nagpur flood victims demand from chief minister eknath shinde tpd 96 mrj

First published on: 08-10-2023 at 16:59 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×