नागपूर : “महाराष्ट्रातील राजकारण दारूच्या पैशांवर चालते. दारूच्याच पैशांनी निवडणुका जिंकल्या जातात”, असा गंभीर आरोप सर्च या संस्थेचे प्रमुख आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केला.

वर्धा येथे आयोजित ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ते बोलत हाेते. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी डाॅ. बंग यांची प्रकट मुलाखत पार पडली. या मुलाखतीत डॉ. बंग म्हणाले, दारूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र तर मद्यराष्ट्र झाले आहे. दरवषी आपल्या राज्यात २ लक्ष कोटींची दारू पिली जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – २८ हजार गावांमध्ये लवकरच ‘बीएसएनएल’ची ‘४ जी’ सेवा, अडीच वर्षांत ‘५ जी’ सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – अकोला : …तर खासदारांच्या घरापुढे धरणे आंदोलन; सर्व शेतमालांच्या वायदे बाजारासाठी शेतकरी संघटना आग्रही

दारू पिणाऱ्यांना अंनिसच्या ताब्यात द्या

दारू पिणाऱ्यांना अंनिसच्या ताब्यात द्या, कारण ते दारू आरोग्याच्या हिताची आहे, असे सांगून अंधश्रद्धा पसरवताहेत, असा खोचक सल्लाही डॉ. बंग यांनी सरकारला दिला.