नागपूरमार्गे पुणे आणि हावडादरम्यान वातानुकूलित गाडी शुक्रवारी सोडण्यात आली आहे. ही गाडी आज हावडय़ाहून निघाली तर पुण्याहून हावडाकरिता १० जानेवारीपासूला निघेल.
०२८२२ हावडा-पुणे प्रिमियम वातानुकूलित गाडी हावडय़ाहून शुक्रवारी सकाळी १०.२५ वाजता निघेल आणि पुण्याला सायंकाळी १८.४० वाजता पोहोचेल.
ही गाडी नागपूरला शनिवारी पहाटे ३.२० वाजता येईल. २२८२१ पुणे-हावडा प्रिमियम वातानुकूलित एक्सप्रेस पुण्याहून रविवारी सकाळी १०.३० वाजता निघेल आणि हावडय़ाला सायंकाळी १८.१५ वाजता
पोहोचेल. ही गाडी नागपुरात सोमवारी रात्री १.३० वाजता येईल. या गाडीला टाटानगर, बिलासपूर, भुसावळ, पनवेल येथे थांबा आहे.