लोकसत्ता टीम

नागपूर : मध्य रेल्वे नागपूर विभागात तिकीट तपासणीस पदावर कार्यरत अल्फिया पठाणने मुष्टीयुद्ध या खेळात नागपूर आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकवले आहे. अलीकडे अल्फिया यांनी एशियन बॉक्सिंग कॉन्फेडरेशनद्वारे कझाकिस्तान येथे आयोजित आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये २२ वर्षांखालील खेळांडूच्या गटात रौप्य पदक मिळवले.

Nitin Gadkari, criticism, comment,
प्रचाराच्या रणधुमाळीत व्यक्तिगत टीका, टिप्पणीपासून ‘हा’ नेता अलिप्त
Raj Thackeray Fatwa
राज ठाकरेंनी काढला फतवा! म्हणाले, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
Rambhau Ingole, Vimalashram,
विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Raju Kendre,
राजू केंद्रे यांची जर्मन सरकारच्या प्रतिष्ठित जर्मन चॅन्सलर फेलोशिपसाठी निवड
Railway, Railway Crackdown Food Vendors, Nagpur Division railway, nagpur news, railway news, marathi news, Unauthorized Food Vendors in railway,
रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, तीन दिवसात २७ जणांना पकडले

अल्फियाने २०२३ मध्ये बिलासपूर, छत्तीसगड येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय आंतर रेल्वे बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने २०२२ मध्ये एलिट बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवला. २०२१ मध्ये तिने युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून “जगातील सर्वोत्कृष्ट बॉक्सर” म्हणून खिताब मिळवला होता.

आणखी वाचा-रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा धडाका, तीन दिवसात २७ जणांना पकडले

अल्फियाचा मुष्टीयुद्ध खेळातील प्रवास लहान वयातच सुरू झाला आणि तिने राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सातत्याने वर्चस्व गाजवले. २०१९ मध्ये तिने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि या खेळातील एक उगवता तारा म्हणून आपली ओळख निर्माण केली. तिला आतापर्यंत १९ सुवर्ण पदके, दोन रौप्य पदके आणि तीन कांस्य पदक प्राप्त झाली आहे.