नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलात अनेक वर्षे देशसेवा केली. निवृत्तीनंतरचे जीवन जगत असतांना मुळचे चंद्रपूरचे रहिवासी असलेले निवृत्त पोलीस हवालदार यांची प्रकृती बिघडली आणि त्यातच त्यांचा मेंदूमृत झाला. कुटुंबियांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अवयव प्रत्यारोपणातून अनेकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे.

अरुण भाटवलकर (६०) रा. घुटाकाळा वार्ड, हनुमान चौक, चंद्रपूर असे अ‌वयव दानदात्याचे नाव आहे. अरूण यांनी अनेक वर्षे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते आरामाचे आयुष्य आनंदात जगत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी अरूण यांची प्रकृती बिघडली. काही वेळातच ते भोवळ येऊन पडले. कुटुंबियांनी त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. अरूण यांची प्रकृती जास्तच खालवत असल्याने कुटुंबियांनी त्यांना नागपुरातील शंकरा रुग्णालयात हलवले. येथेही काही दिवस उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तपासणी अंती त्यांचा मेंदूमृत झाल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती अरुणच्या पत्नी माधुरी, पाच मुली व मुलाला (सीमा (३६), अश्विनी (३४), पल्लवी (३२), कल्याणी (२९), प्राची (२६) आणि मुलगा मानव (२३)) यांना कळवण्यात आली.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
home guards, Kolhapur,
VIDEO : धक्कादायक ! कोल्हापुरातील होमगार्डना मुंबई पोलीस अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक; शिवीगाळ केल्याचा आरोप
Vasai, fake police, keychain,
वसई : एका कीचेनमुळे फुटले नकली पोलिसाचे बिंग
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
fir register, fir register against Police Sub Inspector, Assaulting Key Maker in Vasai, police sub inspector Assaulted key maker in vasai, vasai news,
वसई : अवघ्या २० रुपयांच्या वादात पोलिसाने फोडले नाक, मारहाण करणार्‍या पोलिसावर अखेर गुन्हा दाखल
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Diwya tanwar success story
गरिबीवर मात करून स्वतःच्या हिमतीवर बनली भारतातील सर्वात तरुण IPS अधिकारी! कोण आहे जाणून घ्या…
PSI, MPSC, PSI result,
‘पीएसआय’चा निकाल ‘एमपीएससी’कडून जाहीर, पुणे जिल्ह्यातील उमेदवार राज्यात प्रथम!

हेही वाचा…वाशीम जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, अनेक घरांचे नुकसान

दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांना अवयवदानाचेही महत्व सांगितले. वडिलांची स्थिती पाहूण मानसिक धक्क्यात असलेल्या कुटुंबियांनी मोठे मन करत अवयवदानाला संमती दिली. त्यानंतर अरूण यांना अवयवदानाच्या पुढील प्रक्रियेसाठी नागपुरातील न्यू ईरा रुग्णालयात हलवण्यात आले. येथे रुग्णाच्या अवयवांशी समरूप असलेल्या रुग्णांचा शोध सुरू झाला. त्यानंतर रुग्णाचे दोन मुत्रपिंड, एक यकृताचे इतर रुग्णांत प्रत्यारोपण करून बुब्बुळ मेडिकल रुग्णालयातील नेत्रपेढीला देण्यात आले. या बुब्बुळांचे लवकरच दोन रुग्णात प्रत्यारोपण करून त्यांना नवीन दृष्टी मिळणार आहे. दरम्यान या अवयवदानामुळे अरूण यांनी जगतांना पोलिस विभागात सेवा दिली तर जगाचा निरोप घेताना अवयवदानातून समाजसेवा केली.

अवयवदान कुणाला

अरूण यांचे यकृत न्यू ईरा रुग्णालयातील प्रतिक्षा यादीतील एका ५० वर्षीय पुरूषामध्ये प्रत्यारोपीत केले गेले. तर एक मुत्रपिंड न्यू ईरा रुग्णालयातील एका ४३ वर्षीय महिलेमध्ये तर दुसरे मुत्रपिंड मेडिट्रिना रुग्णालयातील एका ६७ वर्षीय पुरूषामध्ये प्रत्यारोपीत झाले. दोन्ही बुब्बुळ मेडिकलच्या नेत्रपेढीला दिल्याने तेथील दोन रुग्णात लवकरच प्रत्यारोपीत होणार आहे.

हेही वाचा…बुलढाण्यात पाणीटंचाईच्या तीव्र झळा; पावणेदोन लाखांवर ग्रामस्थांची टँकरवर भिस्त

मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाची संख्या १५१ वर

नागपूर विभागात २०२३ पासून २० मे २०२४ पर्यंत मेंदूमृत रुग्णाकडून होणाऱ्या अवयवदानाची संख्या १५१ रुग्णांवर पोहचली आहे. त्यापैकी १ जानेवारी २०२४ ते २० मे २०२४ दरम्यान तब्बल २१ मेंदूमृत रुग्णाकडून अवयवदान झाले, हे विशेष.