२० रुपयांऐवजी ११० रुपये शुल्क? महाविद्यालयांना मात्र कुठलेही परिपत्रक नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणीच्या नावावर आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप महाविद्यालयांकडून होत आहे. प्रथम वर्षांमध्ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नोंदणीसाठी २० रुपयांऐवजी ११० रुपये जमा करावे लागत आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात विद्यापीठाकडून कुठलेही परिपत्रक महाविद्यालयांना देण्यात आले नसून संकेतस्थळावर मात्र नोंदणीसाठी अधिकचे शुल्क घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होत असून विद्यार्थी ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश करतात त्या महाविद्यालयांकडून त्यांची नोंदणी केली जाते. यासाठी विद्यार्थ्यांकडून नोंदणी शुल्क आकारले जाते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून यासाठी २० रुपये तर इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास त्यांना नोंदणीसाठी ११० रुपये शुल्क भरावे लागत होते. मात्र, यंदा विद्यापीठामधील विद्यार्थ्यांकडूनही ११० रुपये शुल्क आकारले जात असल्याने याला विरोध होत आहे. करोनामुळे दोन वर्षांपासून प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने सुरू आहे. त्यामुळे प्रथम वर्ष पदव्युत्तरला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी आता सुरू झाली आहे. ही नोंदणी करताना विद्यापीठाने शुल्कवाढीसंदर्भात कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, संकेतस्थळावर नोंदणी करताना ११० रुपये शुल्क भरावे लागत आहेत. विद्यापीठाने नोंदणी शुल्क वाढवण्यासंदर्भात कुठल्याही सूचना न देता परस्पर असा निर्णय घेतल्याने याला विरोध होत आहे. अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अधिकचे पैसे घेत आता नव्याने नोंदणी करीत आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी २० रुपये भरून नोंदणी केली असेल त्यांना आता नव्याने नोंदणी करताना वरचे ९० रुपये भरून पुन्हा नोंदणी करावी लागत आहे.