scorecardresearch

Premium

सलग दुसऱ्या वर्षी पुण्यात सर्वाधिक लाचखोरी; नाशिक दुसऱ्या तर उपराजधानी पाचव्या क्रमांकावर

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात. 

bribe
प्रतिनिधिक छायाचित्र

अनिल कांबळे, लोकसत्ता

नागपूर :  राज्यात सर्वाधिक लाचखोरीचे गुन्हे पुणे विभागात दाखल असून दुसऱ्या स्थानावर नाशिक तर उपराजधानी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, सुसंस्कृतांचे शहर अशी ओळख असलेले पुणे शहर लाचखोरीच्या प्रकरणात सलग दुसऱ्या वर्षीही प्रथम क्रमांकावर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच लाचखोरीच्या गुन्ह्यांची आणि आरोपींची आकडेवारी जारी केली आहे.

Cheated women by telling them to give foreign tour Wardha
‘फॉरेन टूर’ सांगून भामट्याने घातला लाखोचा गंडा, महिला विमानतळावरून माघारी
ias officer laghima tiwari
कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात बनल्या IAS अधिकारी, लघिमा तिवारींची ‘ही’ रणनिती विद्यार्थ्यांसाठी ठरेल फायदेशीर
sachin tendulkar share post on x about junabai tigress in Tadoba-Andhari Tiger Project
‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान
women breaking traffic rules nagpur
नागपूर : वाहतुकीचे नियम तोडण्यात तरुणी-महिला आघाडीवर, वाहतूक विभागाच्या कारवाईतून तपशील समोर

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात.  आता तर रोख रकमेऐवजी थेट सोन्याचे दागिने किंवा मोठमोठय़ा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू लाचेच्या स्वरूपात मागितले जात असल्याचेही समोर आले आहे. विशेश म्हणजे, महिला कर्मचारीसुद्धा लाच मागण्यात आघाडीवर आहेत. पोलीस आणि महसूल विभागातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वाधिक लाच मागितल्याचेही समोर आले आहे.

गेल्या वर्षभरात  पुणे विभागात  लाच मागितल्याच्या १५५ तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले असून तब्बल २२३ शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.  नाशिक विभागात १२६ सापळय़ात १७८ जणांना अटक करण्यात आली. 

तिसऱ्या क्रमांकावर औरंगाबाद आहे. येथे १२२ सापळे रचून १५७ जणांना अटक केली गेली. नागपूर विभागात ७४ सापळय़ात १०१ जणांना अटक करण्यात आली.

पोलीस-महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट

पोलीस आणि महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर  असल्याची नोंद आहे. पोलीस विभागातील लाचखोरांविरुद्ध १६० सापळे रचण्यात आले.  त्यात २२४ आरोपींना अटक करण्यात आली.  महसूल विभागातील १७५ प्रकरणात  २४६ जणांना अटक करण्यात आली. मात्र, केवळ रकमेचा विचार केल्यास सर्वाधिक लाचेची रक्कम पोलीस विभागाने मागितली आहे.

राज्यात १०३३ लाचखोरांवर कारवाई

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  २०२२ मध्ये राज्यात ७२०  प्रकरणे दाखल केली. यामध्ये १०३३ लाचखोरांना अटक करण्यात आली. लाचखोरांमध्ये ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांची संख्या ७६ असून सर्वाधिक तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा (५६२) समावेश आहे.  १२३ अधिकाऱ्यारी वर्ग दोनचे आहेत.

आकडे काय सांगतात?

शहर          सापळे     लाचखोर

पुणे –         १५५       २२३

नाशिक        १२६       १७८

औरंगाबाद      १२२       १५७

ठाणे            ८४       १२६

नागपूर         ७४       १०१

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Second year in a row most bribery cases in pune zws

First published on: 11-01-2023 at 06:32 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×