scorecardresearch

पटोले यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या आशीष देशमुख यांच्या भेटीला शिक्षक भारतीचे झाडे

माजी आमदार आशीष देशमुख यांनी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगत थेट प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.

पटोले यांच्या हकालपट्टीची मागणी करणाऱ्या आशीष देशमुख यांच्या भेटीला शिक्षक भारतीचे झाडे
शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली.

शत्रूचा शत्रू मित्र या उक्तीप्रमाणे काँग्रेसने ऐनवेळी समर्थन नाकारलेले शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हेच सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीला कारणीभूत आहेत. यापूर्वीदेखील अनेक निवडणुकात घोळ घालण्यात आला, असा आरोप करीत नाना पटोले यांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांच्याकडे केली होती.

हेही वाचा- “जुन्या पेन्शनचा विरोध करणाऱ्या फडणवीसांना शिक्षक त्यांची जागा दाखवतील”; आमदार कपिल पाटील यांचा दावा

दरम्यान इकडे माजी मंत्री सुनील केदार यांनी राजेंद्र झाडे ऐवजी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. नागपूर जिल्ह्यातील राजकारणात सुनील केदार आणि आशिष देशमुख यांचे साप आणि मुंगूस यांचे नाते आहे. अशा प्रकारे पटोले यांच्यावर दिल्लीत जाऊन राजकीय तोफ डागुन आलेले आणि केदार यांचे राजकीय हाडवैरी झाडे यांना जवळचे वाटले असावे, त्यातून त्यांनी आज माजी आमदार आशिष देशमुख यांची भेट घेतली. याभेटीमागे मतदारांच्या बेरजेचे गणितदेखील आहे. देशमुख यांच्याकडे अनेक शाळा आणि महाविद्यालय आहेत. तेथील मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 12:36 IST

संबंधित बातम्या