बुलढाणा : भरधाव मालमोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीने क्षणार्धात पेट घेतला. खामगाव चिखली मार्गावरील लोखंडा फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी दुचाकीस्वार रवींद्र जाधव यांना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मालमोटारीची धडक इतकी भीषण होती की, दुचाकीने क्षणात पेट घेतला! काही वेळातच गाडीचा केवळ सांगाडाच उरल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पेटते वाहन पाहण्यासाठी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हिडीओ -लोकसत्ता टीम हेही वाचा - नागपुरात पावसामुळे कच्च्या विटांची माती, २५ लाखांची हानी रवींद्र जाधव जानेफळ (ता. मेहकर) येथील मूळ रहिवासी असून ते खामगाव एसटी आगारात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाच वृत्त कळताच एसटी कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने आगारातील कर्मचाऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.