"नागपूर-हैदराबादला जोडणारी 'वंदे भारत एक्स्प्रेस' सुरू करा", मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी | sudhir mungantiwar demand vande bharat express between nagpur hyderabad write letter to railway minister rmm 97 | Loksatta

“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी

नागपूर ते हैदराबाद दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

“नागपूर-हैदराबादला जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करा”, मुनगंटीवारांची केंद्र सरकारकडे मागणी
फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम

विदर्भातील चारही जिल्ह्यांचा हैदराबादशी जवळचा व्यापारी संबंध आहे. त्यामुळे नागपूर ते हैदराबाद दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना पत्र लिहून ही मागणी केली.

नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांसाठी जवळचे सगळ्यात मोठं शहर आहे. तसेच ते एक औद्योगिक शहर आहे. दुसरीकडे हैदराबाद हे दक्षिणेकडील या भागातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र आणि औद्योगिक शहर आहे.

सध्या नागपूर आणि हैदराबादला जोडणार्‍या २२ रेल्वे गाड्या आहेत. पण ५७५ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी एक वेगवान रेल्वे असणे आवश्यक आहे. नागपूर-हैदराबाद मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे सुरू झाल्यास नागपूरसोबतच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांनाही ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा फायदा होईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा- PHOTOS : ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अहमदाबाद-मुंबई मार्गावर चाचणी

या भागात येणारे पर्यटक, व्यापारी आणि उद्योजक यांच्या सोयीसाठी नागपूर-हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 18:45 IST
Next Story
चंद्रपूर: सरपण आणण्यासाठी जंगलात गेला अन् वाघाचा भक्ष्य ठरला…