नागपूर : अवकाळी पाऊस अधूनमधून आव्हान देत असला तरी वैदर्भीय उन्हाळा सुरू झालाय. पारा अक्षरशः ४०-४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे आणि अशावेळी तहानेने जीव व्याकुळ होणार नाही तर काय..? माणसे पाण्याची बाटली सोबत घेऊन फिरतात, पण त्या मूक जीवांचे काय..? जे जंगलात राहतात. त्यांना तर तलावावर धाव घेण्याशिवाय पर्याय नसतो. ताडोबातील वाघीण आणि तिच्या बचड्यांचा तलावावर पाणी पितानाचा अतिशय सुंदर असा व्हिडीओ पियूष आकरे, असीम भगत व नितीन बारापात्रे यांनी टिपला आहे.

उन्हाळ्याची गर्मी सुरू होताच आतापर्यंत जंगलाच्या आत राहणारे वाघ आणि त्यांचे कुटुंबीय तहान भागवण्यासाठी बाहेर येऊ लागले आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “के मार्क” या वाघिणीला न ओळखणारे असे नाहीतच. ताडोबात ती पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ती तिच्या दोन बचड्यांसह फिरताना नेहमीच दिसून येते. रविवारी सकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सोमनाथ सफारी प्रवेशद्वारालगतच्या वनक्षेत्रात “के मार्क” वाघीण तिच्या बछड्यांसाह तलावावर पाणी पिताना दिसली. ते अतिशय तहानलेले होते आणि पानवठ्याजवळ पोहोचताच त्यांनी घटाघटा पाणी पिण्यास सुरुवात केली. पर्यटकांसाठी ही पर्वणीच होती. त्यांनीही मग कॅमेरे काढून ते दृश्य टिपण्यास सुरुवात केली.

bear and tiger viral video loksatta
Video: अस्वलाचे वाघाला आव्हान! ताडोबाच्या जंगलातील थरार
yavatmal forest marathi news, tipeshwar wildlife sanctuary marathi news
यवतमाळ : अभयारण्यात वाघासोबत सेल्फी घेणे पडले महागात; वनक्षेत्र अधिकारी…
tiger unexpectedly came out of bushes jumped on cow
जंगल सफारीचा आनंद घेत होते पर्यटक, अचानक झुडपातून बाहेर आला वाघ, उडी मारून….पुढे काय घडले ते व्हिडीओमध्ये बघा
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

हेही वाचा…अमरावतीत पुन्‍हा ट्विस्‍ट; आनंदराज आंबेडकर यांचा निवडणूक लढण्‍याचा निर्णय

उन्हाळाची गर्मी सुरू होताच ताडोबाच्या सोमनाथ मधील “के मार्क” वाघीण आणि तींच्या बछड्याची मनमोहक छायाचित्रे व व्हिडीओ डेक्कन ड्रिफ्टसचे प्रमुख व वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे, असीम भगत व नितीन बारापात्रे यांनी टिपली आहे.