वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांनी मागण्या मान्य झाल्यानंतर आपले आंदोलन मागे घेतले आहे. रात्री नऊ वाजता विद्यापीठ प्रशासन व आंदोलक यांच्यातील चर्चा यशस्वी झाली. विद्यापीठाचे कुलसचिव कादर नवाज खान यांनी विद्यार्थ्यांना एका पत्रातून तीन विविध पर्याय देत मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा- नागपूर : रेल्वेत आढळली १३९९ बेवारस मुले; कौटुंबिक समस्या, शहराच्या आकर्षणामुळे घर सोडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बजावण्यात आलेली नोटीस मागे घेण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. अखेर विद्यार्थ्यांनी लेखी हमी मिळाल्यानंतर आंदोलन व उपोषण मागे घेतले. आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण असल्याची बाब ‘लोकसत्ता ऑनलाईन’ने निदर्शनास आणली होती. विद्यार्थी नेते योगेश जंगीड याने स्पष्ट केले की, ‘लोकसत्ता’ने आमच्या तीव्र भावना निदर्शनास आणल्यानंतर तडजोडीच्या भूमिकेस वेग आला. प्रशासन पुढे आले. चर्चा झाली व मार्ग निघाला. आम्ही प्रथम विद्यार्थीच आहोत, आंदोलक नाहीत.