‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरी

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित राज्यस्तरीय लोकांकिका स्पर्धेची मुंबईत होणारी महाअंतिम फेरी कोण गाठणार, याचा फैसला उद्या गुरुवारी आयोजित नागपूर विभागीय अंतिम फेरीत होणार आहे. महाअंतिम फेरी गाठायचीच या संकल्पासह उद्या पाचही चमू सादरीकरण करणार आहेत.

६ आणि ७ डिसेंबरला झालेल्या प्राथमिक फेरीत विदर्भातून आलेल्या एकांकिकांमधून पाच एकांकिकांनी विभागीय फेरीत प्रवेश केला. यामध्ये यामध्ये ‘मुक्ताई’, ‘अतिथी’, ‘दिव्यदान’, ‘हिरवीन’ आणि ‘तमासगीर’ यांचा समावेश आहे. या पाचही एकांकिका उद्या सकाळी ११ वाजता सायंटिफिक सभागृहातील रंगमंचावर भिडणार आहेत. यातील एका एकांकिकेला महाअंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार असल्याने पाचही एकांकिकांची जय्यत तयारी झाली आहे.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, ‘लोकसत्ता लोकांकिका २०१९’ या स्पध्रेचे ‘मे.बी.जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ हे सहप्रायोजक आहेत, तर ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटरटेक प्रायव्हेट लिमिटेड’, आणि ‘एम.के. घारे ज्वेलर्स’ हे पॉवर्डबाय पार्टनर आहेत. लोकसत्ता लोकांकिकेच्या कलाकारांना चित्रपट, मालिकांमध्ये संधी देणारे ‘आयरिश प्रॉडक्शन’ हे टॅलेंट पार्टनर असून ‘अस्तित्व’च्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली.

विभागीय अंतिम फेरी गाठलेल्या पाच एकांकिका

अतिथी – वसंत शिक्षण महाविद्यालय

मुक्ताई – संताजी महाविद्यालय

दिव्यदान – कमिन्स

अभियांत्रिकी महिला महाविद्यालय

हिरवीन – धरमपेठ सायन्स महाविद्यालय

तमासगीर – व्हीएमव्ही महाविद्यालय