शेतात धान कापत असताना वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. ही घटना आज गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील रामाळा गावाजवळ घडली. ताराबाई एकनाथ धोडरे(६०)रा. काळागोटा, आरमोरी असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई धोडरे ही आज अन्य सहा मजूर महिलांसह रामाळा येथील अमोल धोडरे यांच्या शेतात धान कापणीसाठी गेली होती. 

हेही वाचा >>> नागपूर : महापालिकेत निधी वाटपात पक्षपात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष पोहोचले…

case of accommodating contract workers Municipal administration rushes after Supreme Court order
कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

धान कापत असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. यावेळी सोबत असलेल्या महिला पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.