scorecardresearch

Premium

चंद्रपूर : शेतात मृतावस्थेत आढळली वाघीण; आठ दिवसांत ३ बछडे आणि वाघिणीच्या मृत्यूने वनखात्यात खळबळ

शेतमालकाने फिस्कुटीच्या सरपंचांमार्फत ही पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिका-यांना कळवले.

tiger
शेतात मृतावस्थेत आढळली वाघीण; आठ दिवसांत ३ बछडे आणि वाघिणीच्या मृत्यूने वनखात्यात खळबळ

चंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रात वाघिणीपासून दुरावल्याने तिच्या तीन पिल्लांचा उपासमारीने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज, मंगळवारी सकाळी पोंभुर्णा तालुक्यांअंतर्गत येणाऱ्या फिस्कुटी गावातील शेतात अडीच वर्षांची वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनखात्यात खळबळ उडाली आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील फीस्कुटी येथील पपलू वामन शेंडे हे चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या जगदिश गावतुरे यांची शेती करतात. मंगळवारी सकाळी ७:३० वाजताचे सुमारास एक मजूर महिला निंदनासाठी त्यांच्या शेतात गेली असता त्यांना वाघीण मृतावस्थेत आढळली.

त्यांनी ही माहिती शेतमालकाला दिली. शेतमालकाने फिस्कुटीच्या सरपंचांमार्फत ही पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिका-यांना कळवले. माहिती मिळताच वनाधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. विशेष म्हणजे, ३१ जुलै रोजी भद्रावती तालुक्यातील एका गावात जिवंत वीज पुरवठा सोडून वाघाची शिकार करण्यात आली होती. या वाघिणीसोबतही तसाच प्रकार घडला तर नसावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Drugs case arrest Nashik
नाशिकमध्ये अमली पदार्थाची खरेदी, विक्री प्रकरणी पाच जण ताब्यात
ration distribution mediator beaten Kalyan
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण
The mystery of firing on the motor vehicle inspector increased Nagpur
मोटार वाहन निरीक्षकावरील गोळीबाराचे गुढ वाढले
mumbai high court marathi news, house owner mumbai marathi news, landlord mumbai marathi news
भाडेकरुंच्या गुन्ह्याची शिक्षा घरमालकाला देता येणार नाही, घरमालकाला दोषमुक्त करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tigress dies of starvation in ballarpur forest area chandrapur rsj 74 amy

First published on: 12-09-2023 at 13:46 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×