नागपूर : नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात उन्हाची दाहकता वाढत आहे. उकाड्यापासून वाचण्यासाठी आता घरोघरी कूलर लागत आहेत. दरम्यान प्रत्येक वर्षी नागपुरात सुमारे ७ तर राज्यात ५० नागरिकांना कूलरचा शॉक लागून मृत्यू होत असल्याचे निरीक्षण महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्हे व राज्यातील इतरही भागात दिवसेंदिवस पारा वर चढत आहे. या वाढत्या तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी वातानुकुलित यंत्राच्या तुलनेत कूलर वापरणाऱ्यांची संख्या जास्त असते. नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागाचा विचार केल्यास प्रत्येक वर्षी येथे विजेच्या धक्क्याने सुमारे ७ नागरिकांचा मृत्यू होतो. तर राज्यातही ५० मृत्यू नोंदवले जातात. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू हे विदर्भ व मराठवाड्यात होतात.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?

हेही वाचा…दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारू विक्री, निवडणूक काळात…..

कूलरचे अपघात टाळण्यासाठी ते लावण्यापूर्वी घरातील अर्थिंगची चाचणी अधिकृत कंत्राटदार किंवा इलेक्ट्रिशियनकडून करा, आयएसआय मार्क नसलेले ‘लोकल’ कूलर वापरू नका, विजेचा धक्का हा जीवघेणा असतो. पण, पुरेशी खबरदारी घेतली तर विजेच्या धक्क्यामुळे होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो, घरात ‘अर्थ लिकेज सर्किट ब्रेक’ (ईएलसीबी) हे उपकरण बसविले तर जीव वाचू शकतो. हे उपकरण असल्यास अपघाताच्यावेळी वीजपुरवठा खंडित होतो व जीव वाचतो.

हेही वाचा…‘‘नवनीत राणांच्‍या जात प्रमाणपत्राचा निकाल भाजपला ठाऊक आहे का?’’

ही काळजी घेण्याची गरज…

कूलरला अर्थिंग असल्याची खात्री करा

वायरिंग योग्य असल्याचे तपासा

पाणी भरतांना कूलरची बटण बंद करून प्लग काढा

वीजसंच मांडणीला ई. एल. सी. बी. किंवा आर. सी. सी. बी. ही उपकरणे जोडा

कूलरमध्ये करंट येत असल्याचे कळताच तो बंद करून दुरूस्त करेपर्यंत सुरू करू नका

ओल्या हाताने कूलर हाताळू नका

विजेचा धक्का लागल्यास त्या व्यक्तीस हात लावू नका, कोरड्या लाकडी दांड्याने त्याला कूलरपासून वेगळे करा

जोड असलेले वायर नको, अखंड वायर वापरा

कूलर चालू करण्यापूर्वी, पॉवर कॉर्ड आणि प्लगमध्ये खराब भाग नसल्याची खात्री करा

कूलरला नेहमी एका स्वतंत्र पॉवर सॉकेटवर लावा

एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे चालू करू नका

लहान मुलांना कूलरपासून लांब ठेवा

कूलरची नियमितपणे तपासणी करा