नागपूर : राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, खर्रासह तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध आहे. त्यानंतरही नागपूरसह मध्य भारतात उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याचे निरीक्षण इंडियन डेंटल असोसिएशनने नोंदवले आहे. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

उच्चभ्रू घरातील तरुणींमध्ये गुटखा, पानमसाला, सिगारेट, हुक्का, ई-सिगारेटचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. दातांशी संबंधित समस्या उद्भवल्यास या तरुणी दंतरोग तज्ज्ञांकडे येतात. यावरून तरुणींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याचे निरीक्षण इंडियन डेंटल असोसिएशनने नोंदवले आहे. मध्य भारतात एकूण कर्करुग्णांमध्ये ३० टक्के मुखाच्या कर्करुग्णांचा समावेश आहे.

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
lighting on trees for decoration, lighting on trees thane marathi news
ठाणे, कल्याण- डोंबिवली, मिरा भाईंदरमध्ये वृक्षांचा गळा घोटण्याचे कार्य सुरूच, उच्च न्यायालयाच्या नोटीस नंतरही शहरात वृक्षांवर विद्युत रोषणाई

हेही वाचा – ‘एमपीएससी’ प्रशासन विद्यार्थीकेंद्रित असणे गरजेचे! आयोगाचे माजी सदस्य दयानंद मेश्राम यांचे मत

मुखाच्या कर्करुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांच्या आजाराला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन प्रमुख कारण आहे. तंबाखूमुळे दर ८ सेकंदाला ‘एक’ मृत्यू होतो. भारतात, तंबाखू संबंधित मृत्यूची एकूण संख्या दरवर्षी ८ ते ९ लाख इतकी असेल. तंबाखूपासून दूर राहिल्यास एका तरुण-तरुणींचा जीवनकाळ २० वर्षाने वाढू शकेल. तंबाखूच्या सेवनामुळे तोंड, ओठ, जबडा, फुफ्फुस, घसा, पोट, किडनी व मूत्राशयाचा कर्करोग होतो. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. भारतात, ५६.४ टक्के स्त्रियांना आणि ४४.९ टक्के पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. ८२ टक्के फुफ्फुसाच्या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान आहे. धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढवते आणि हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

कुटुंबातील सदस्यांवरही वाईट परिणाम

“कुटुंबातल्या इतर सदस्यांनादेखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम सांगून या धोक्यापासून वाचवावे.” – डॉ. अभय दातारकर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय.

हेही वाचा – नागपूर : प्रकल्प समर्थक नागरिक की भाजपा कार्यकर्ते? कोराडीतील जनसुनावणीवर प्रश्नचिन्ह, विराेधात बोलणाऱ्यांचा आवाज दडपला

तंबाखू सोडणे फायद्याचे

“तंबाखू सोडल्यास संबंधिताला कर्करोग व हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे तंबाखू सोडवण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे.” – डॉ. वैभव कारेमोरे, माजी अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन.