महसूल अधिकाऱ्यांच्या आजच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे महसूल विभागाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. जिल्हा कचेरीत केवळ दोनच अधिकारी तर तहसीलमध्ये कुणी अधिकारीच नाहीत, असे चित्र होते.बक्षी समितीने अनुकूल अहवाल दिला. मात्र, वेतन लागू करण्यात आले नाही. यामुळे आज सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार सहभागी झाले. यामुळे जिल्हाधिकारी, सहा उपविभागीय कार्यालये आणि १३ तहसीलचे काम विनाअधिकारीच कसेबसे पार पडले.

हेही वाचा >>>वर्धा : रेल्वे महाव्यवस्थापकांचा दौरा अन् स्थानिक प्रशासनाचा काळजाचा ठोका चुकतो तेव्हा..

दरम्यान, पूर्व घोषित कार्यक्रमानुसार आज पाचही जिल्ह्यातील हे अधिकारी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्हाध्यक्ष आर.एन. देवकर, सचिव हेमंत पाटील, विभागीय सहसचिव संजय गरकल, बुलढाणा ‘एसडीओ’ राजेश्वर हांडे, तहसीलदार रूपेश खंडारे, नायब तहसीलदार प्रकाश डब्बे, सुनील आहेर आदी सहभागी झाले. जिल्ह्यातील ६ तहसीलदार व २८ नायब तहसीलदार अमरावती येथील धरणे आंदोलनात सहभागी झाले.

सहा हजारांवर अधिकाऱ्यांचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावतीप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर वरील तीन संवर्गातील अधिकाऱ्यांनी आज धरणे दिले. संघटनेच्या वरिष्ठ सूत्रानुसार राज्यातील ४ हजार नायब तहसीलदार, १५०० तहसीलदार व ८०० उपजिल्हाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.